आजचे राशिभविष्य, 11 फेब्रुवारी 2025 : कर्क, सिंहसह 5 राशींसाठी धनलाभाचे योग ! निर्णय घेताना सतर्क राहा ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya 11 February 2025 Today Horoscope in Marathi : आज मंगळवार रोजी बुधाचे संक्रमण होणार असून मंगळ बुधच्या राशीत विराजमान होईल, यामुळे नवम पंचम योग तयार होतो आहे. मंगळ आणि चंद्राच्या स्थितीमुळे अनफा योग निर्माण होईल. मंगळवार हा गणराया आणि बजरंबली हनुमान यांचा दिवस मानला जातो, त्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर त्यांची कृपादृष्टी असेल. विशेषतः कर्क, सिंह आणि इतर 5 राशींना धनलाभाचे योग, करिअरमध्ये प्रगती आणि घरात आनंदी वातावरण असेल. तुमची राशी काय सांगते तसेच तुमचा दिवस कसा असेल चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आज होणारे बुध आणि चंद्राचे गोचर खूप शुभ असणार आहे. बुध कुंभ राशीत येऊन शनीसोबत युती करणार तर चंद्र कर्क राशीत पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्रातून संचार करणार आहेत. यामुळे तयार होणारा चंद्रमा शशि योग आणि अनफा योग कर्क, सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशींसाठी उत्तम असणार आहे. नोकरीमधील समस्या मार्गी लागतील, करिअरमध्ये यश आहे. व्यापारातील समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश तसेच प्रत्येक कामात जोडीदाराची साथ असेल. चला, जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

​मेष – ऑफिसमधील बदल फायदेशीर

आज भरपूर सामाजिक कार्य करणार आहात, यामुळे भविष्यात तुम्हाला नक्कीच लाभ होईल. कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याची तब्येत अचानक बिघडू शकते. त्यामुळे तुमचे टेन्शन वाढणार आहे. कार्यक्षेत्रात काही बदल होणार आहेत पण काळजी करु नका. तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरतील. मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज अधिक मेहनत करावी लागेल, त्यानंतरच नफा मिळेल.

आज तुमचं भाग्य 89% तुमच्या बाजूने राहील. शिव जाप माला याचे पठण करा.

​वृषभ – आनंद देणारी बातमी समजणार

आजचा दिवस सुखद असून कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात. सासरकडून आनंद देणारी बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. दैनंदिन गरजांसाठी काही खर्च करणार आहात. व्यवसाय करत असाल, तुमच्यासाठी दिवस

फायदेशीर ठरेल.

आज तुमचं भाग्य 65% तुमच्या बाजूने राहील. नियमितपणे तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा.

​मिथुन – नोकरदारांसाठी बढतीचा योग

नोकरी करणाऱ्यांना घरच्या कामांवरही लक्ष द्यावं लागेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पदोन्नतीचे योग आहेत. काही मानसिक समस्यांचा सामना करत असाल तर त्यापासून दिलासा मिळेल. व्यवसायात काही जोखमींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याचा विचार करा.

आज तुमचं भाग्य 72% तुमच्या बाजूने राहील. माता लक्ष्मीला खीर अर्पण करा.

​कर्क – धनलाभाचा योग, निर्णय घेताना सतर्क राहा

आज अचानक मोठ्या प्रमाणात धनलाभाचा योग आहे. कोणताही निर्णय घाई आणि भावना यांच्या आधारावर घेतला, तर तो तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. निर्णय घेताना सतर्क राहा. कुटुंबासोबत तीर्थयात्रेचे प्लॅनिंग करणार आहात. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस चांगला आहे.

आज तुमचं भाग्य 86% तुमच्या बाजूने राहील. गुरुजन किंवा वरिष्ठ लोकांचे आशीर्वाद घ्या.

​सिंह – प्रत्येक कामात यश

आजचा दिवस तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न असेल. जे काही काम कराल, त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील. जर आज तुम्ही तुमचं महत्त्वाचं काम सोडून दुसऱ्याची मदत करण्यासाठी पुढे आलात, तर लोक ते तुमचं स्वार्थ मानू शकतात, म्हणून सावध रहा. विरोधक किंवा शत्रू सक्रिय होतील आणि त्रास देण्याचा प्रयत्न करतील, सावध रहावे.

आज तुमचं भाग्य 66% तुमच्या बाजूने राहील. माता पार्वतीची पूजा करावी.

​कन्या – नोकरी करणाऱ्यांना बोलणी खावी लागतील

व्यवसायात आज खूप मेहनत करावी लागेल तर यश मिळेल. नवीन योजना तुमच्यासाठी लाभदायक असेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची बोलणी खावी लागणार आहेत. आज प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी रागावर नियंत्रण ठेवा आणि अपशब्द बोलू नका. कुटुंबातील संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. आज संध्याकाळी तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात.

आज तुमचं भाग्य 98% तुमच्या बाजूने राहील. अन्नदान करावे.

​तुळ – नवीन योजना लाभदायक

तुम्ही व्यापारासाठी काही नवीन योजना राबवणार आहात, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. आईवडिलांचं आशीर्वाद घेऊन काम सुरू केले, तर त्यात यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. प्रत्येक कामात जोडीदाराची साथ आहे.

तब्येत सांभाळा आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

आज तुमचं भाग्य 77% तुमच्या बाजूने राहील. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा.

​वृश्चिक – बोलण्यावर नियंत्रण ठेवा

आज तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होईल जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने तुमचे बाकीचे काम पूर्ण करा. संध्याकाळी कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबातील कोणाशी वाद झाला, तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तणाव अधिक वाढेल.

आज तुमचं भाग्य 73% तुमच्या बाजूने राहील. गणपतीला दुर्वा अर्पण करा.

​धनु – घरातील वाद टेन्शन वाढविणार

आज तुम्हाला दैनंदिन गरजांसाठी अधिक खर्च करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत भांडण होणार असून तुमचे टेन्शन वाढेल. ऑफिसमध्ये कामात दुर्लक्ष होवू शकतो, सतत घरातील भांडणं डोक्यात येतील. आज कोणालाही पैसे उधार देण्याचा विचार करु नका. खर्चात थोडी वाढ होईल पण तुम्ही काहीही करु शकणार नाही.

आज तुमचं भाग्य 69% तुमच्या बाजूने राहील. भगवान विष्णूचे पूजन करावे.

​मकर – व्यवसायात बदल करण्यासाठी अनुकूल दिवस

जर तुम्ही तुमचा व्यवसाय बदलण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक स्थिती आधीपेक्षा उत्तम होईल. तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल, तर तुमच्या पार्टनरवर अती विश्वास ठेवू नका, नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला मुलांकडून आंनदाची बातमी मिळू शकते.

आज तुमचं भाग्य 64% तुमच्या बाजूने राहील. श्री शिव चालीसाचे पठण करा.

​कुंभ – संपत्ती मिळण्याचे योग

आज तुम्हाला वडिलोपार्जीत संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खूप खुष होणार आहात. मन प्रसन्न असेल, कामे उत्साहात पार पडतील. सासरकडील कोणत्या व्यक्तीसोबत तुमचा वाद सुरू असेल, तर त्यावर तोडगा निघेल. जोडीदार अचानक आजारी पडू शकतो. तुम्ही नकारात्मक विचारांना मनात थारा देवू नका.

आज तुमचं भाग्य 74% तुमच्या बाजूने राहील. गरजूंना अन्न, वस्त्र दान करा.

​मीन – कामे पटापट मार्गी लागतील

आज तुमचं दांपत्य जीवन आनंदी असेल. जोडीदाराची साथ प्रत्येक कामात मिळेल. सगळी कामे नीट मार्गी लागतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस जास्त मेहनतीचा आहे. परिक्षेत उत्तम यश मिळेल. मित्रांसोबत एखाद्या तीर्थस्थानाला जाण्याचा विचार करु शकता.

आज तुमचं भाग्य 81% तुमच्या बाजूने राहील. गरजूंना तांदूळाचे दान करा.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Aaj che Rashi bhavishya 11 february 2025 11 फेब्रुवारी 2025Daily horoscope 11 February 2025 MarathiHoroscope 11 February in marathiToday's Rashifal 11 February 2025 in marathiआज चे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2025 Daily horoscope 11 February 2025 Marathiकसा असेल माझा दिवस?
Comments (0)
Add Comment