Today Panchang 12 February 2025 in Marathi: बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५,भारतीय सौर २३ माघ शके १९४६, माघ पौर्णिमा सायं. ७-२२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा सायं. ७-३४ पर्यंत, चंद्रराशी: कर्क सायं. ७-३४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: धनिष्ठा
आश्लेषा नक्षत्र सायंकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, सौभाग्य योग सकाळी ८ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ, बव करण सायंकाळी ७ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र सायंकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१०
- सूर्यास्त: सायं. ६-३६
- चंद्रोदय: सायं. ६-२९
- चंद्रास्त: सकाळी ६-५७
- पूर्ण भरती: दुपारी १२-०० पाण्याची उंची ३.७५ मीटर, रात्री १२-३९ पाण्याची उंची ४.५३ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-२८ पाण्याची उंची १.४४ मीटर, सायं. ६-०९ पाण्याची उंची ०.७० मीटर.
- सण आणि व्रत : माघ स्नान समाप्ती, सर्वार्थ सिद्धि योग, रवि योग, ब्रह्म योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १९ मिनिटांपासून ते ६ वाजून १० मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २७ मिनिटांपासून ते ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ते ६ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ८ वाजून २५ मिनिटांपासून ते ९ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटांपासून ते १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ७ वाजून २ मिनिटांपासून ते ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
गणपतीला २१ दुर्वा अर्पण करून भगवान विष्णु यांची विधीवत पूजा करावी.
(आचार्य कृष्णदत्त)