Sanam Teri Kasam Rerelease Box Office Collection Day 5: ‘सनम तेरी कसम’ या सिनेमाने ५ दिवसात किती केली कमाई? रेकॉर्ड ब्रेक कामगिरीसाठी सज्ज!
हायलाइट्स:
- ‘सनम तेरी कसम’ची किती झाली कमाई?
- ५ दिवसांत २५ कोटींचा गल्ला
- ९ वर्षांपूर्वी कमावले होते फक्त ९ कोटी
रेकॉर्ड मोडण्यासाठी ‘सनम तेरी कसम’ सज्ज
दीपक मुकूट यांची निर्मिती, तसेच राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित ‘सनम तेरी कसम’चे बजेट २५ कोटी रुपये होते. २०१६ मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ९.१० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता ९ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर, ५ दिवसांत या चित्रपटाची कमाई २५.१६ कोटी झाली आहे. याआधी ‘ये जवानी है दिवानी’ने रीरीलिज झाल्यानंतर सर्वाधिक म्हणजे २६.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता ‘सनम तेरी कसम’ पहिल्याच आठवड्यात हा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.
रीलिजनंतर किती झाली आहे ‘सनम तेरी कसम’ची कमाई?
७ फेब्रुवारी, पहिला दिवस- ५.१४ कोटी
८ फेब्रुवारी, दुसरा दिवस- ६.२२ कोटी
९ फेब्रुवारी, तिसरा दिवस- ७.२१ कोटी
१० फेब्रुवारी, चौथा दिवस- ३.५२ कोटी
११ फेब्रुवारी, पाचवा दिवस- ३.०७ कोटी
एकूण कमाई- २५.१६ कोटी रुपये
हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांनी या चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजेच ‘इंदर’ आणि ‘सरू’ साकारल्या होत्या. हर्षवर्धन सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यग्र आहे, तो सिनेमागृहांना भेटी देतोय आणि सिनेमाच्या यशाविषयी विविध ठिकाणी मुलाखतीही देतोय. प्रमोशन किंवा सिनेमाच्या रीरीलिजमध्ये मावरा कोणत्याही प्रकारे सहभागी नसली तरी सोशल मीडियावर सिनेमाच्या यशासाठी आनंद व्यक्त केला होता.