Pune-इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणा-या चोर अटक विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी

Pune-इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणा-या चोर अटक विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 70306 46046

Online News Pune-विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना भोसले, संजय बादरे, अक्षय चपटे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे प्रशांत दिगंबर पाटील रा. औरंगाबाद याने केला असून तो गुन्हयात चोरलेला माल घेऊन विकण्यासाठी भरुच गुजरात या ठिकाणी गेला आहे. मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे पोउनि नितीन राठोड, व स्टाफ हे भरुच गुजरात या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलीसांची मदतीने आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने आरोपीस गुन्हयात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले इलेक्ट्रीक साहित्यासह पकडून त्याचेकडून २,५०,०००/-रु. किंमतीचा महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले १६,१९,४१७/- रु. किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य असा एकूण १८,६९,४१७/-रु.चा माल केला हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री मंगेश हांडे, यांचे सुचनेप्रमाणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Comments (0)
Add Comment