आजचे राशिभविष्य, 14 फेब्रुवारी 2025 : बुधादित्य राजयोग, कर्क राशीचे ऑफिसमध्ये कौतुक ! मकर राशीला प्रोजेक्टमध्ये उत्तम यश ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya 14 February 2025 Today Horoscope in Marathi : 14 फेब्रुवारी, शुक्रवार आज शुक्र उच्च राशीमध्ये असून अत्यंत शुभ योग तयार करत आहे. त्याला राहुची देखील साथ असेल. चंद्र सिंह राशीत संक्रमण करेल तर पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा प्रभावही दिसून येईल, यामुळे मेष आणि कर्कसह 5 राशींचे नशिब चमकणार आहे. भौतिक सुख-साधनांसह आर्थिक लाभाचा योग असेल. त्याचबरोबर प्रेमाचा दिवस अर्था व्हेलेंटाईन डे असून त्याचा आनंद प्रत्येक राशीच्या जातकांना मिळेल. दरम्यान आज तुमची राशी काय सांगते, तुमचा दिवस कसा असेल चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शुक्रवार कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aaj Che Rashi Bhavishya 14 February 2025: शुक्रवारी द्वितीय तिथीचा योग असून बुध शतभिषा नक्षत्रातून संक्रमण करेल. तर शुक्र ग्रह मीन राशीतून राजयोग तयार करेल. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन राशीवर असेल. आज गजकेसरी योग, तसेच अमला आणि इतर काही शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे या राशीच्या जातकांना अप्रत्यक्षपणे लाभ होणार आहे. सुख- साधनांमध्ये वाढ, नोकरीत यश आणि व्यवसायात दुप्पट नफा असेल. तसेच व्हेलेटाईन डे असून सर्व राशींच्या लोकांना प्रेमाची मधुर अनुभूती होईल. तुमच्या राशीत काय लिहीलं आहे? चला, जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

​मेष – रागावर कंट्रोल ठेवा

आज तुम्हाला तुमच्या वागणुकीत बदल करावा लागेल. राग कितीही आला तर व्यक्त करु नका. रागावर कंट्रोल महत्त्वाचा आहे. शांत करा आणि मनातील कटुता दूर करा. सर्वांसोबत चांगेलपणाने वागा, अन्यथा तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. आज तुम्ही थांबलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. घरात वातावरण ठिक असून जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा असेल.

आज तुमचे भाग्य 81% तुमच्या बाजूने राहील. शिवलिंगावर दूध अर्पण करा.

​वृषभ – चांगली बातमी मिळणार

प्रशासन आणि सत्ता यांच्या युतीचा फायदा होणार आहे. नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. जे लोक राजकारणाच्या दिशेने प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी आज यशाच्या नवीन मार्ग खुले होतील. संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाणार आहात. घरात आनंद, समाधान असेल.

आज तुमचे भाग्य 93% तुमच्या बाजूने राहील. गणरायाला लाडू अर्पण करा.

​मिथुन – प्रवासात चोरीची शक्यता, सतर्क राहा

आज तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करत असाल तर सतर्क राहा, कारण प्रवासात चोरी होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या. कामे पूर्ण करताना घाई करु नका, कारण जर काही चूका झाल्या तर त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील. आर्थिक स्थिती ठिक असेल.

आज तुमचे भाग्य 71% तुमच्या बाजूने राहील. माता लक्ष्मीची पूजा करा.

​कर्क – ऑफिसमध्ये कौतुक होणार

आजचा दिवस तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी योजना बनवण्यात घालवणार आहात. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या सुचना ऑफिसमध्ये मान्य होतील. तसेच तुमचे कौतुक देखील होईल. मान-सम्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही पैसे खास ठिकाणी गुंतवणार आहात, भविष्यात त्याचा दुप्पट फायदा मिळेल.

आज तुमचे भाग्य 77% तुमच्या बाजूने राहील. गायत्री चालीसा वाचावे.

​सिंह – प्रत्येक कामात जोश उत्साह असेल

आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. प्रत्येक कामात जोश दिसून येईल. सर्व कार्य उत्साहाने पूर्ण होतील. जे लोक शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. काही विरोधक तुमच्या चांगल्या कामांना खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध राहा. संध्याकाळी नातेवाईकांच्या घरी मंगलकार्याला जाणार आहात.

आज तुमचे भाग्य 72% तुमच्या बाजूने राहील. विष्णु सहस्त्रनामाचे पठण करा.

​कन्या – कोर्टाचा निकाल तुमच्याबाजूने लागेल

जर संपत्ती खरेदी-विक्रीचे प्रकरण कोर्टात सुरु असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. विद्यार्थ्यांनी जर एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर यशस्वी व्हाल. रोजगार आणि व्यापार क्षेत्रात चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. संध्याकाळी आई-वडिलांसोबत देवदर्शनासाठी जाणार आहात.

आज तुमचे भाग्य 71% तुमच्या बाजूने राहील. तुळशीला जल अर्पण करून दिवा लावा.

​तुळ – कुटुंबातील वाद संपुष्टात येतील

कुटुंबात खूप दिवसांपासून वाद सुरु असेल तर तो आज संपुष्टात येईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न असेल. काही विरोधक तुमच्या प्रगतीला पाहून तुमचा द्वेष करतील पण काहीही काळजी करु नका, सगळं काही ठिक होणार आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात तुमचे पैसे अडकू शकतात.

आज तुमचे भाग्य 67% तुमच्या बाजूने राहील. कोणत्याही गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा.

​वृश्चिक – खर्चावर नियंत्रण गरजेचे

आज तुम्ही जीवनसाथीच्या सल्ल्याने कोणतेही कार्य असेल ते सफल होईल. तुम्हाला काही खर्चाचा सामना करावा लागू शकतो, तुमची थोडी चिडचिड वाढेल. तुमची आर्थिक स्थिती विचारात घेऊन खर्च करा, नाहीतर भविष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते.

आज तुमचे भाग्य 87% तुमच्या बाजूने राहील. पहिली पोळी गायीला द्या

​धनु – नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील

नोकरी करणारे जातक जर नवीन कामाच्या शोधात असतील तर त्यात यश मिळेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, तसेच तपासणी करून घ्या. तुम्हाला एखाद्या नातेवाईकासाठी काही पैशांची जुळवाजुळव करावी लागेल. वाढत्या खर्चामुळे ताण वाढण्याची शक्यता आहे.

आज तुमचे भाग्य 77% तुमच्या बाजूने राहील. श्रीकृष्णाला लोणीसाखरेचा नैवेदय दाखवा

​मकर – नोकरी करणाऱ्यांना मोठं यश

नोकरी करणाऱ्यांना मोठं यश मिळेल. जर तुमचा कुणाशी वाद-विवाद सुरू असेल, तर तो वाढणार नाही याकडे लक्ष द्या. बोलण्यात गोडवा हवा, अन्यथा जीवनात समस्या येवू शकतात. आई-वडिलांच्या सल्ल्याने काम केलं तर नक्की यश मिळेल. घरात वातावरण समाधानी असेल.

आज तुमचे भाग्य 62% तुमच्या बाजूने राहील. योग आणि प्राणायाम करा.

​कुंभ – कुटुंबातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करा

आज तुम्हाला उदास करणारी बातमी ऐकायला मिळणार आहे. तात्काळ कोणाची तरी भेट घ्यावी लागेल. कुटुंबात कोणता वाद सुरू असेल, तर तो संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती ठिक असून गुंतवणुकिचा विचार करू शकता.

आज तुमचे भाग्य 65% तुमच्या बाजूने राहील. तुळशीला जल अर्पण करून दिवा लावा.

​मीन – नातेवाईकांच्या भेटी होतील

जोडीदाराच्या तब्येतीची काळजी करणार आहात, पण टेन्शन घेवू नका ही समस्या फक्त थोड्या वेळासाठीच असेल. मुलांच्या शिक्षेबद्दल काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. आज काही जुन्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबाच्या संपत्ती वाढ होणार आहे.

आज तुमचे भाग्य 89% तुमच्या बाजूने राहील. गणपतीला लाडू अर्पण करा.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Aaj che Rashi bhavishya 14 february 2025 14 फेब्रुवारी 2025Daily horoscope 14 February 2025 MarathiHoroscope 14 February in marathiToday's Rashifal 14 February 2025 in marathiआज चे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2025कसा असेल माझा दिवस?
Comments (0)
Add Comment