Rashi Bhavishya 15 February 2025 Today Horoscope in Marathi : शनिवारी बजरंगबली हनुमान आणि शनिदेवाची कृपा सगळ्या राशीच्या जातकांवर असेल. मेष राशीचे ऑफिसमध्ये कौतुक तर वृषभचा मानसन्मान वाढणार, कन्या राशीच्या लोकांचा खर्च वाढणार तर कुंभ राशीच्या जातकांसाठी नवीन व्यवसाय सुरु करणे उत्तम असेल. मीन राशीचा व्यवसायानिमित्त प्रवास होणार. आज तुमची राशी काय सांगते, तुमचा दिवस कसा असेल चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शनिवार कसा आहे.
मेष – ऑफिसमध्ये कौतुक होणार

आज तुम्ही जे काही कार्य कराल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या आवडीचे काम करायला मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी विरोधकांकडून
देखील तुमची प्रशंसा होईल आणि अधिकारी वर्ग तुमच्यावर आनंदी असेल. गुंतवणुकिचा विचार करत असाल तर वडिलांची सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घ्या.
आज तुमचं भाग्य 93% तुमच्या सोबत असेल. पिपंळाच्या झाडाखाली दूध मिश्रित जल अर्पण करा.
वृषभ – मानसन्मान वाढणार

कुटुंबातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतीत करणार आहात. यामुळे घरातील लहान मुलं तुमच्यावर खुश असतील. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात. तुमचा मान-सम्मान वाढेल. आर्थिक स्थिती उत्तम असून भरपूर कामे मिळणार आहेत. कामाचे योग्य नियोजन तुम्हाला सफलता देईल.
आज तुमचे भाग्य 77% तुमच्या सोबत असेल. गायीला हिरवा चारा खायला घाला.
मिथुन – संपत्ती मिळणार, बँक बॅलन्स वाढणार
वडिलांचा आणि उच्च अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मौल्यवान संपत्ती मिळवून देणार आहे. खूप काळानंतर बँक बॅलन्स वाढेल आणि आर्थिक स्थिती उत्तम असेल. जोडीदाराच्या साथीने केलेले कार्य नक्कीच यश देणार आहे.
आज तुमचे भाग्य 86% तुमच्या सोबत असेल. शिवलिंगवर दूध अर्पण करा.
कर्क -व्यावसायिक योजनांना गती मिळणार
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असून व्यावसायिक योजनांना गती मिळेल, ज्यामुळे धन लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल फक्त घाई-गडबडीत आणि भावुकतेतून कोणताही निर्णय घेतल्यास, नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. संध्याकाळी कुटुंबासोबत देवदर्शनाला जाणार आहात.
आज तुमचे भाग्य 74% तुमच्या सोबत असेल. पांढऱ्या वस्तुंचं दान करा.
सिंह – नवीन कामे सुरु करा, यश मिळेल
जे लोक राजकारणात आहेत त्यांना उत्तम यश आहे. छोटे व्यापारी अडचणींचा सामान करतील, त्यांना काही रक्कम कमी पडेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील.
तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नवीन काम सुरू केले, तर ते नक्की पूर्ण होईल. जे अवावाहित आहेत त्यांच्यासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
आज तुमचे भाग्य 69% तुमच्या सोबत असेल. शिव चालीसाचे पठण करा.
कन्या – खर्च वाढणार आहे
आज तुम्हाला काही खर्चांचा सामना करावा लागेल, जो तुम्हाला पटणार नाही. तुमची चिडचिड होवू शकते. संध्याकाळी पाहुणे येऊ शकतात, ज्यामुळे खर्चात वाढ होईल. सासरकडील व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करत असाल तर पत्नीला याची माहिती द्या. ज्येष्ठांची सेवा करण्यात वेळ जाणार आहे.
आज तुमचे भाग्य 91% तुमच्या सोबत असेल. गुरुजन किंवा वरिष्ठ लोकांचे आशीर्वाद घ्या.
तुळ – वादावर तोडगा सापडेल
शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात विशेष यश मिळेल. व्यापाऱ्यांना उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. ज्यामुळे समधान मिळेल. जोडीदारासोबतच्या वादावर तोडगा मिळेल. बदलत्या हवामानामुळे तब्येतीवर परिणाम होणार आहे, तेव्हा काळजी घ्या. संध्याकाळी आई-वडिलांसोबत खास मुद्द्यावर चर्चा होईल.
आज तुमचा भाग्य 92% तुमच्या सोबत असेल. भगवान श्री कृष्णाची पूजा करा.
वृश्चिक – विरोधकांकडे दुर्लक्ष करा
आज तुमची थांबलेली कामे पूर्ण होऊन तुम्ही आनंदी असाल. तुमचे शत्रू किंवा विरोधक तुमची प्रगती पाहून ईर्ष्या करू शकतात, पण तुम्ही दुर्लक्ष करा. सासरकडून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाणार आहात. आज तुमचे भाग्य 97% तुमच्या सोबत असेल. माता सरस्वतीची पूजा करा.
धनु – टीका सहन करावी लागेल
आज भौतिक सुखाची साधने वाढतील, ज्यामुळे कुटुंबीय आनंदी असतील. नोकरी करणाऱ्यांचा सहकाऱ्याशी वाद होऊ शकतो, पण तुम्ही सौम्य भाषा वापरा आणि रागावर नियंत्रण ठेवा. अधिकारी टीका करतील पण आज सहन करण्यापलीकडे काही नसेल. तुम्ही अडचणीत सापडलेल्यांना मदत करा, नक्की फायदा होईल.
आज तुमचे भाग्य 85% तुमच्या सोबत असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
मकर – वाहन चालवताना सतर्क राहा
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असून व्यवसायात नफा येईल. आज तुम्ही तुमच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यावर काही पैसे खर्च कराल, जे तुम्ही बाजूला काढले होते. वाहन वापरत असाल तर सावध राहा. कारण वाहन अचानक खराब झाल्यामुळे आर्थिक खर्च वाढू शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
आज तुमचे भाग्य 72% तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूची आराधना करा.
कुंभ – नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळ उत्तम
आज मुलांची कामे करण्यात तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. एखाद्या संपत्तीची खरेदी-विक्री करण्याचा विचार करत असाल, तर कायदेशीर पैलू गंभीरतेने तपासा. जर तुम्ही आज काही नवीन व्यवसाय सुरू करत असाल, तर तो फायदेशीर ठरेल. तब्येतीची काळजी घ्या. आहाराकडे लक्ष द्या. काही गोष्टी तुम्हाला त्रास देतील, सतर्क राहा.
आज तुमचे भाग्य 79% तुमच्या सोबत असेल. पिवळे वस्त्र दान करा.
मीन – व्यवसायानिमित्त प्रवास होणार
आज व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होणार आहे. संध्याकाळी मित्रांसोबत फिरताना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ओझ्यापासून मुक्तता मिळेल, ज्यामुळे ते आनंदी असतील. आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार जे काही कराल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
आज तुमचे भाग्य 76% तुमच्या सोबत असेल. गायत्री चालीसाचे पठण करा.