Chhaava Movie Box Office Collection: छावा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा ३६.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे दोन दिवसांत चित्रपटाची कमाई ६७.५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने जगभरात ५० कोटी रुपये कमावले होते, आता दोन दिवसांत जगभरातली कमाई ही १०० कोटींच्या पार जाईल असे म्हटले जाते.
छावा मध्ये विकी कौशलने मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र होते. रश्मिका मंदानाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे तर अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
या मराठीचीही मोठी स्टारकास्ट आहे. यामध्ये संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर, नीलकांती पाटेकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
Chhaava ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, दुसऱ्या दिवशीही दुमदुमली छत्रपती संभाजी महाराजांची गर्जना
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘सरदार उधम’ आणि ‘सॅम बहादूर’ हे चित्रपट देखील चरित्रावर आधारित होते. तर छावा ऐतिहासिक सिनेमा आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.