Vicky Kaushal Chhaava Box Office Collection Day 3: विकी कौशल-रश्मिका मंदाना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने अवघ्या ३ दिवसात १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
हायलाइट्स:
- ‘छावा’ सिनेमाची ३ दिवसाची कमाई किती?
- बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ नावाचे वादळ
- विकी कौशलची देशभरात जादू
३ दिवसात किती झाली कमाई?
रीलिजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ या सिनेमाने भारतात ३३.१ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी, पहिल्या शनिवारी ही कमाई ३९.४० कोटी रुपयांवर पोहोचली. Sacnilk ने दिलेल्या वृत्तानुसार तिसऱ्या दिवसाच्या कमाईची सुरुवातीची आकडेवारी ३६.६३ कोटी झाली आहे. यानंतर ३ दिवसांची एकूण कमाई १०९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही, परिणामी या आकड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विकी कौशलने शेअर केली पोस्ट
‘छावा’ सिनेमाला मिळत असलेले प्रेम आणि कमाई पाहता या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने ‘आज रवि-वार नाही, रोअरिंग-वार आहे’ असे म्हणत ही पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे, तर एका फोटोमध्ये ‘छावा’ची दोन दिवसाची कमाई किती झाली हे शेअर केले. अभिनेत्याने आणखी एक स्लाइड पोस्ट करत म्हटले की, ‘तुमचे प्रेम बघून मन भरुन आले, खूप धन्यवाद!’
विकीने शेअर केलेल्या या आणि अशा अनेक पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्याने आतापर्यंतचे सर्वोत्तम काम केल्याच्या प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.