Sanam Teri Kasam Rerelease Box Office Collection Day 10: ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाची दहा दिवसांमध्ये किती कमाई झाली, घ्या जाणून
हायलाइट्स:
- ‘सनम तेरी कसम’ ९ वर्षांनी पुन्हा झाला रीलिज
- मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणे यांचा सिनेमा
- ९ वर्षांपूर्वी ठरलेला फ्लॉप
५.१४ कोटी रुपयांच्या जबरदस्त ओपनिंगसह १४ फेब्रुवारी रोजी ‘सनम तेरी कसम’ची सुरुवात झाली. त्यानंतर आता रविवारी १६ फेब्रुवारी या चित्रपटाने १.७२ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. त्यामुळे एकूण १० दिवसात या चित्रपटाची कमाई ३६.०१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सिनेमाच्या टीमकडून याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली असून चाहत्यांना अपेक्षा ५० कोटीची आहे. दीपक मुकूट यांची निर्मिती, तसेच राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित ‘सनम तेरी कसम’ हा आकडा गाठेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ सिनेमाचे वादळ
‘सनम तेरी कसम’ हा सिनेमा गेल्या काही दिवसात १-२ कोटी रुपये दररोज कमावत असला तरी या चित्रपटासमोर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ चित्रपटाचे तगडे आव्हान आहे. ‘छावा’ने अवघ्या तीन दिवसात १२१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे सकाळपासून रात्रीपर्यंतचे शो अवघ्या देशभरात हाऊसफुल्ल आहेत. ‘लव्हयापा’, ‘स्काय फोर्स’, ‘बॅडअॅस रविकुमार’ या चित्रपटांचा सुपडा साफ झाला आहे, केवळ ‘सनम तेरी कसम’ या रीरीलिज झालेल्या सिनेमाची थोडीफार कमाई होते आहे.