Rashi Bhavishya 18 February 2025 Today Horoscope in Marathi : मंगळवारी मेष राशीने वादविवादापासून दूर राहावे. वृषभसाठी प्रत्येक कामात कठोर मेहनत आहे तुळ राशीने वेळेवर काम पूर्ण करावे. कुंभ राशीसाठी नातेसंबंधात समन्वय महत्त्वाचा तर मीन राशीच्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आज तुमची राशी काय सांगते, तुमचा दिवस कसा असेल चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवार कसा आहे.
मेष – वादविवादापासून दूर राहा

आज नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस फारसा चांगला नाही, वरिष्ठ अधिकारीसोबत मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे तुमची पदोन्नती थांबू शकते. जर असे झाले, तर तुम्ही वाद घालून गोष्टी वाढवू नका. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत व्यतीत करणर आहात. लवलाइफ ठिक असेल.
आज तुमचे भाग्य 77% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करा.
वृषभ – कठोर मेहनत तरच यश

विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना एखाद्या महिला कर्मचाऱ्यामुळे लाभ होईल. काही सामाजिक योजनांचा लाभ मिळू शकतो. व्यापारात, जर तुम्ही नवीन योजना केल्या आहेत तर त्याचा उत्तम लाभ मिळेल.
आज तुमचे भाग्य 79% तुमच्या बाजूने असेल. सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
मिथुन – नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळणार
आज तुम्हाला पूर्ण दिवसभर व्यापारात छोटे-मोठ्या लाभाच्या संधी असतील. दैनंदिन खर्च आणि मिळत याची ताळमेळ जुळेल. संसारात वाद सुरु असतील तर ते संपुष्टात येतील. रात्री कुटुंबासोबत जेवायला जाणार आहात. नोकरी करणारे चांगल्या संधीच्या शोध्यात असतील तर नवीन संधी मिळेल.
आज तुमचे भाग्य 83% तुमच्या बाजूने असेल गरीबांना वस्त्र आणि अन्न दान करा.
कर्क – व्यापारात फार गुंतवणूक करू नका
आज नोकरीत तुम्ही आनंदी असाल. विरोधकांवर दुर्लक्ष करा, कोणी तुम्हाला रागाने बोललं तर मनात ठेवू नका. व्यापारात फार गुंतवणूक करू नका. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रशंसा होईल. आज कुटुंब आणि मित्र परिवार तुमचे कौतुक करेल. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याचा योग आहे.
आज तुमचे भाग्य 80% तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवा.
सिंह – अनोळखी लोकांसोबत व्यवहार नको
आज कुटुंबातील लोक प्रत्येक बाबतीत तुमचं समर्थन करतील. नोकरीत बढतीचे योग तसेच व्यापारात चांगला नफा मिळेल. काही कामे करताना कठोर मेहनत करावी लागेल. आज मन अस्वस्थ असेल, पण फार टेन्शन घेवू नका. घरात किंवा व्यापारात कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करण्यापूर्वी नीट विचार करा.
आज तुमचे भाग्य 66% तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामाचा अभ्यास करा.
कन्या – मेहनतीने केलेली कामे यश देणार
आज तुम्ही जे काही काम कठोर परिश्रमाने कराल, ते पूर्ण होईल. जर तुम्ही इतरांकडून काही काम करून घेणार असा विचार कराल तर ती कामे पुढे ढकलली जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून सहकार्य मिळेल. जर कोणतीही समस्या दीर्घकाळापासून चालू असेल तर त्यावर आजा तोडगा निघेल. आज किती ही विपरीत परिस्थिती निर्माण झाली, तरी रागावर नियंत्रण ठेवा.
आज तुमचे भाग्य 95% तुमच्या बाजूने असेल. शिव जप मालाचे पठण करा.
तुळ – वेळेवर काम पूर्ण करा
आजचा दिवस तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सोपवलेले काम वेळेवर पूर्ण कराल. विविध कामांमध्ये रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता वाढल्याने मन प्रसन्न राहिल. कोणत्याही प्रवासाला जाताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणात तुमचा विजय होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे.
आज तुमचे भाग्य 81% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.
वृश्चिक – निर्णय क्षमतेचा फायदा होईल.
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. दीर्घकालीन योजना पुढे कराल. भावांकडून मदत मिळेल. काही प्रकरणांमध्ये तुम्ही संकोच न करता पुढे जाल. व्यवसायात काम पुढे ढकलू नका. अडचणींना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी अडथळे दूर होतील. निर्णय क्षमतेचा फायदा होईल. स्वत:च्या कामापेक्षा इतरांच्या कामाकडे लक्ष द्याल. अडचणी येतील.
आज तुमचे भाग्य 83% तुमच्या बाजूने असेल. अन्नदान करा
धनु – नात्यात तणाव येईल.
आजचा दिवस तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडा कमजोर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. सहकाऱ्यांवर विचारपूर्वक विश्वास ठेवा. नवीन मार्गावर चालण्याची संधी मिळेल. नात्यात काहीसा तणाव येईल. अनपेक्षित परिस्थिती तुमच्या समोर उभी राहील. आज तुम्ही दिवसातील काही वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यात घालवाल.
आज तुमचे भाग्य 91% तुमच्या बाजूने असेल. माता पार्वतीची पूजा करा.
मकर – सकारात्मक विचार करा
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तुमच्या जुन्या कामांना गती मिळाल्याने आनंदी व्हाल. विचारपूर्वक जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी कराल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास राहिल. सर्वांना सोबत घेऊन राहाल, ज्यात तुम्हाला यश मिळेल. परेदशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल. पार्टनरशीपमध्ये काम करताना भागिदारावर लक्ष ठेवा.
आज तुमचे भाग्य 86% तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेवून तेल अर्पण करा.
कुंभ – नातेसंबंधात समन्वय साधा
कौटुंबिक जीवनात आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुमचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखला पाहिजे. भविष्यासाठी बजेट बनवण्यात यशस्वी व्हाल, जे तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. कामाच्या बाबतीत सावध राहा. कोणीतरी तुम्हाला त्रास देईल. काही लोकांशी सावधगिरी बाळगणे चांगले राहिल. नातेसंबंधात समन्वय साधा. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या.
आज तुमचे भाग्य 71% तुमच्या बाजूने असेल. सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा.
मीन – विद्यार्थ्यांना यश मिळेल
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा ताण येईल. त्यातून तुम्हाला बाहेर पडावे लागेल. कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यास तुमचे मन प्रसन्न राहिल. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. स्पर्धेत सहभागी होऊ शकता. विचार चांगला ठेवा
आज तुमचे भाग्य 94% तुमच्या बाजूने असेल. पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून महादेवावर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा.