Chhaava Box Office Collection: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चांगला चालत आहे. या चित्रपटाने बुधवारी त्याच्या पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली.
हायलाइट्स:
- विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने बुधवारी कमाल केली.
- या चित्रपटाने सहाव्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली आहे.
- १३० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे कलेक्शन आता दुप्पट झाले आहे.
पहिल्या दिवशीचा विक्रम मोडला, ३२ कोटी रुपये कमावले
लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी कलेक्शनमध्ये वाढ झाली. सोमवारी, चित्रपटाने सुमारे २४ कोटी रुपये कमावले आणि तेव्हापासून, कलेक्शन वाढत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, बुधवारी चित्रपटाने पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडला आणि ३२ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने देशभरात सुमारे १९७.७५ कोटी रुपये कमावले आहेत.
सिनेमाचे बजेट अन् कमाई
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने सुमारे २६५ कोटी रुपये कमावले आहेत. तर परदेशात चित्रपटाने ३० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सुमारे १३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जवळजवळ दुप्पट खर्च वसूल केला आहे.
शिवजयंतीला शिवरायांच्या छावा प्रेक्षकांच्या मनात भिडला, विकी कौशलच्या सिनेमाने डबल केली कमाई
संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल
हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. विकीला त्याच्या भूमिकेसाठी खूप कौतुक मिळत आहे. विकी कौशल व्यतिरिक्त, या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम आणि प्रदीप रावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर मराठीतले संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.