Today Panchang 22 February 2025 in Marathi: शनिवार, २२ फेब्रुवारी २०२५, भारतीय सौर ३ फाल्गुन शके १९४६, माघ कृष्ण नवमी दुपारी १-१८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठा सायं. ५-३९ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक सायं. ५-३९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: शततारका
ज्येष्ठा नक्षत्र सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग, ११ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, गर करण दुपारी १ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण आरंभ, चंद्र सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०४
- सूर्यास्त: सायं. ६-४१
- चंद्रोदय: उत्तररात्री ३-०७
- चंद्रास्त: दुपारी १-०८
- पूर्ण भरती: पहाटे ४-५३ पाण्याची उंची ३.१० मीटर, रात्री ८-०९ पाण्याची उंची ३.२३ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-२२ पाण्याची उंची १.५० मीटर, उत्तररात्री २-०५ पाण्याची उंची २.६३ मीटर.
- सण आणि व्रत : लक्ष्मी योग, समसप्तक योग, त्रिग्रह योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १२ मिनिटांपासून ते ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपासून ते ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून ते रात्री १ वाजेपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ते ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ८ वाजून १८ मिनिटांपासून ते ९ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपासून ते ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
शनिदेवाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलीत करा.
(आचार्य कृष्णदत्त)