आजचे अंकभविष्य, 22 फेब्रुवारी 2025: मूलांक 4 मेहनतीने अडचणींवर मात करणार !मूलांक 9 साठी प्रत्येक कामात यश ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 22 February 2025 : शनिवार असून शनिदेवाचा आशीर्वाद सर्व मूलांकावर कायम राहणार आहे. मूलांक 1 चे जातक अनोख्या उत्साहात कामे मार्गी लावतील. मूलांक 3 साठी क्रिएटीव्हीटीने भरलेला दिवस आहे. मूलांक 5 च्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. मूलांक 8 चे लोक कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेणार तर मूलांक 9 साठी दिवस उत्तम असून प्रत्येक कामात यश मिळेल. चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aajche Ank bhavishya, 22 February 2025: मूलांक 1 सह या मूलांकांसाठी दिवस चांगला असून कामे मार्गी लागतील. मूलांक 4 सह या जातकांना कामात अडचणी येतील पण मेहनतीने तुम्ही संकटांवर मात कराल. शनिवारी, तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

​मेष – महत्त्वाचे निर्णयासाठी सखोल विचार महत्त्वाचा

आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील एखादी महत्त्वाची डील अंतिम होण्यासाठी थोडं थांबावं लागू शकतं. त्यामुळे, आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, तर तो काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्यावा. आज चांगल्या कामासाठी खर्च केल्यामुळे तुमची प्रतीष्ठा वाढेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यावर चर्चा होणार आहे. कुटुंबात एखादा विशेष सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल.

आज तुमचे भाग्य 77% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या नावाचा १०८ वेळा जप करा.

​वृषभ – अडचणींवर तोडगा सापडणार

जर तुम्ही आज तुमच्या व्यवसायाचं ठिकाण बदलण्याचा विचार करत असाल, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणींवर समाधान मिळेल, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आणि लहान मुलं तुमच्याकडे काही मागण्या करतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल.

आज तुमचं भाग्य 64% तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा.

​मिथुन – व्यवसायात नव्या योजनेचा विचार करणार

आज तुमच्या मनात काही नवीन व्यावसायिक योजना येऊ शकतात, ज्या तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शेअर कराल आणि त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांना त्यांचे आवडीचे काम मिळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांना आज त्यांचे सिनिअर्स शिक्षणाच्या बाबतीत मदत करतील. तुमच्या समस्यांचे समाधान मिळेल.

आज तुमचं भाग्य 66% तुमच्या बाजूने राहील. अन्नदान करा.

​कर्क – नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळेल

तुम्ही खूप दिवसांपासून राहीलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या भावाशी चर्चा करू शकता. नोकरीसाठी अर्ज केला असेल तर सकारात्मक बातमी मिळेल. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात. नोकरी आणि ऑफिसमध्ये तुमच्या विचारांचे स्वागत होईल.

आज तुमचं भाग्य 87% तुमच्या बाजूने राहील. चंदनाचा टीळा लावा.

​सिंह – ऑफिसमध्ये वादविवाद टाळा

आज कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळावे, अन्यथा भांडण विकोपाला जाईल. नोकरीच्या क्षेत्रात अस्थिरतेमुळे काही समस्या उद्भवतील. ज्यामुळे मन अस्वस्थ राहिल. कौटुंबिक समस्या संयमाने सोडवा. मोठ्यांच्या मदतीने प्रलंबित सरकारी कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना पैशांची गरज भासू शकते. यश मिळवण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे.

आज तुमचं भाग्य 90% तुमच्या बाजूने राहील. सफेद रेशमी वस्त्र दान करा.

​कन्या – अनावश्यक खर्चांना कमी करा

आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न कराल आज कोणत्याही प्रकारच्या जोखमीपासून दूर राहा. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक समस्या आज संपतील. लोक तुमच्या कार्यशैलीने प्रभावित होतील. तुमचा आदर करतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नवे मार्ग शोधणार आहात. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. अनावश्यक खर्च समोर येतील.

आज तुमचं भाग्य 88 % तुमच्या बाजूने राहील. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा

तुळ – व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल

आज कौटुंबिक जीवनात तुमचा आदर वाढेल. जोडीदाराच्या बाबतीत सावध राहाल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल. काम केल्याने जबाबदारी वाढेल. सामाजिक कामे केल्याने पाठिंबा मिळेल. तुमच्या धैर्याची आणि शौर्याची प्रशंसा होणार आहे, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळी बाहेर जाऊ शकता.

आज तुमचं भाग्य 65 % तुमच्या बाजूने राहील. गरजवंतांना मदत करा.

​वृश्चिक – स्वतःसाठी वेळ काढा

आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. व्यस्त जीवनशैलीतून स्वत:साठी वेळ काढाल. नवीन व्यवसाय सुरु करताना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अनावश्यक खर्च वाढतील. आर्थिक लाभाची स्थिती चांगली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायात कठिण परिस्थितीत वडिलांचा पाठिंबा फायदेशीर ठरेल.

आज तुमचं भाग्य 91 % तुमच्या बाजूने राहील. देवी सरस्वतीची पूजा करा.

​धनु – कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता

आज कुटुंबात काही मुद्द्यावरुन मतभेद होतील. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, नात्यात दूरावा येऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. आरोग्याबाबत सावध राहा. खाण्यापिण्याची सवयी विशेष काळजी घ्या. अडकलेले पैसे मिळतील. जोडीदारासाठी नवीन भेटवस्तू खरेदी कराल.

आज तुमचं भाग्य 72% तुमच्या बाजूने राहील. गणरायाला लाडूचा नैवेदय दाखवा.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

22 फेब्रुवारी 2025 कसा असेल माझा दिवस?Aaj che Ank Jyotish 22 February 2025Numerology 22 February 2025 horoscopeNumerology Horoscope In Marathi 22 February Today's Numerology 22 February prediction January in marathitodays horoscope in marathiअंक ज्योतिष दैनिक भविष्यवाणीआजचा शुभ अंक 22 फेब्रुवारी 2025आजचे अंकज्योतिष 22 फेब्रुवारी 2025आजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्याकोणते अंकशास्त्र भाग्यवान आहे? व्यवसायात नफा होईल?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?राशी भविष्यव्यवसायात नफा होईल?
Comments (0)
Add Comment