Chhaava Box Office Collection: विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता या सिनेमाची ३०० कोटींकडे वाटचाल सुरू झाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाने ३१ कोटींची ओपनिंग केली होती.
हायलाइट्स:
- ‘छावा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींकडे वाटचाल
- ‘छावा’ची नऊ दिवसांची कमाई
- दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाच्या कमाईचा वेग कमी झालेला नाही.
‘छावा’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘छावा’ने दुसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, या सिनेमाने सुमारे ४५ कोटी रुपये कमावले. भारतात त्याचे एकूण कलेक्शन आता २८७.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दिवसभरात प्रेक्षकांची सातत्याने वाढ झाली, थिएटरमध्ये सरासरी ५०.४५ टक्के प्रेक्षकांची गर्दी होती. सकाळच्या शोमध्ये ३५.५५ टक्के, दुपारच्या शोमध्ये ५३.९८ टक्के आणि संध्याकाळच्या शोमध्ये ६१.८२ टक्के प्रेक्षकांची गर्दी नोंदवली गेली.
बॉक्स ऑफिसवर थंडावण्याची चिन्हे नाहीत.
‘छावा’ हा बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठा हिट चित्रपट असल्याचे दिसते. ३१ कोटी रुपयांच्या ब्लॉकबस्टर ओपनिंगनंतर, या चित्रपटाने भारतात २१९.२५ कोटी रुपयांची कमाई करून पहिला आठवडा पूर्ण केला. शनिवारी ३७ कोटी रुपये आणि रविवारी ४८.५ कोटी रुपये कमाई केली. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची गती कमी होण्याऐवजी वाढत आहे. दुसऱ्या शुक्रवारी ‘छावा’ने २३.५ कोटी रुपयांची कमाई केली, जी गुरुवारच्या २१.५ कोटी रुपयांच्या कमाईपेक्षा ९.३० टक्क्यांनी जास्त होती. अजूनही प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेले थिएटर्स, टाळ्यांचा कडकडाट अन् विक्रमी कमाई, ‘छावा’ ३०० कोटींकडे मार्गस्थ
‘छावा’ मधील कलाकार
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट महान मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये विकी कौशलने मराठा साम्राज्याच्या संस्थापकाचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना त्यांची पत्नी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने औरंगजेबाचा कमाल अभिनय केला आहे. आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर मराठीत सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारख्या बऱ्याच कलाकारांच्या भूमिका आहेत.