Chhaava Box Office Collection : विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने ११ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने परदेशातही मोठी कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील यशस्वी चित्रपटांपैकी एक बनला आहे.
हायलाइट्स:
- ‘छावा’ चित्रपटाची कमाई ११ दिवसांची कमाई
- ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित आहे.
- दुसऱ्या सोमवारी किती झाली कमाई
संभाजी महाराजांची म्हणजेच छावाची कहाणी
हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचा २४ वर्षांचा धाडसी आणि साहसी पुत्र संभाजी महाराज यांची कथा आहे. ते सुद्धा त्यांच्या वडिलांइतकेच शूर आणि शक्तिशाली होते. विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
दुसऱ्या सोमवारी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई
लोकांना या चित्रपटाची कथा आणि विकी कौशलचा अभिनयही आवडतोय. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे. मात्र हे आकडे या वर्षी आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा अजूनही चांगले आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने ११ व्या दिवशी १८.५० कोटी रुपये कमावले आहेत आणि आतापर्यंत एकूण ३४५.२५ कोटी रुपये कमावले आहेत.
Chhaava Box Office:छावाची ११ व्या दिवशी सर्वात कमी कमाई, पण तरीही मोडले सुपरहिट सिनेमांचे रेकॉर्डस्; किती कमावले माहितीये
‘छावा’ची जगभरातील कमाई
जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत सुमारे ४६५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने परदेशात सुमारे ५५ कोटी रुपये कमावले आहेत. भारतात या चित्रपटाने ३९१.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.