Chhaava Box Office Collection: विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. १२ व्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर या चित्रपटाने रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ आणि अमिताभ-प्रभासच्या ‘कल्की’ २८९८ एडी’ला मागे टाकले आहे.
हायलाइट्स:
- विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने १२ दिवसांत बरीच कमाई केली आहे.
- हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत आहे.
- या चित्रपटाच्या कमाईने बऱ्याच सिनेमांना मागे टाकले
‘छावा’ ने ‘कल्की २८९८ इडी’ ला मागे टाकले.
गेल्या दोन दिवसांत ‘छावा’ थोडा डळमळीत दिसत होता, परंतु त्याचे कलेक्शन कमी झाले नाही. १२ व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने गेल्या वर्षीच्या अमिताभ आणि प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘कल्की’ने १२ व्या दिवशी १०.४ कोटी रुपये आणि ‘अॅनिमल’ने १२.७२ कोटी रुपये कमावले होते, तर ‘छावा’ त्यांच्या खूप पुढे गेला आहे१२ दिवसांच्या एकूण कमाईच्या बाबतीत, या दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन अजूनही ‘छावा’ पेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर टॉप चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या ‘बाहुबली २’ची १२ व्या दिवसाची कमाईही ‘छावा’समोर घसरली आहे. ‘बाहुबली २’ ने १२ व्या दिवशी १५.७५ कोटी रुपये कमावले होते.
‘छावा’ची १२ व्या दिवसाची कमाई
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने १२ व्या दिवशी सुमारे १७.०० कोटी रुपये कमावले आहेत, तर एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, देशभरात आतापर्यंत तो सुमारे ३६२.२५ कोटी रुपये कमावण्यात यशस्वी झाला आहे.
chhaava box office collection:छावाने बाहुबली आणि अॅनिमलसारख्या तडगड्या सिनेमांनाही टाकलं पाठी, बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस
‘छावा’ची जगभरातील कमाई
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने आता ५०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात सुमारे ८० कोटी रुपये कमावले आहेत. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम, प्रदीप रावत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सोबत सुव्रत जोशी, मनोज कोल्हाटकर, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे आणि संतोष जुवेकर अशा बऱ्याच मराठी कलाकारांची फौजही या सिनेमाला लाभली आहे.