Chhaava Box Office Report: विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने १३ दिवसांतच बंपर कमाई केली आहे, ज्यामुळे त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. महाशिवरात्रीला या चित्रपटाला विशेष यश मिळाले आणि बॉक्स ऑफिसवर त्याने खूप कमाई केली.
हायलाइट्स:
- ‘छावा’ चित्रपटाने १३ व्या दिवशी थिएटरमध्ये भरपूर कमाई केली आहे.
- महाशिवरात्रीच्या सुट्टीमुळे चित्रपटाच्या कमाईला फायदा झाला.
- ‘छावा’ने ‘जवान’च्या कलेक्शनलाही मागे टाकले
‘छावा’ ‘जवान’ पेक्षा खूप पुढे
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने दुसऱ्या मंगळवारी म्हणजेच १३ व्या दिवशी २१.७५ कोटी रुपये कमावले आहेत. त्याच वेळी, ‘छावा’ शाहरुखच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ‘जवान’ चित्रपटापेक्षाही खूप पुढे गेला आहे. ‘जवान’ने १३ व्या दिवशी फक्त १४.४ कोटी रुपये कमावले होते. शिवाय छावा परदेशातही भरपूर कमाई करत आहे.
‘छावाचे वर्ल्डवाइड कलेक्शन’
‘छवा’च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने सुमारे ५४० कोटी रुपये कमावले आहेत. जर फक्त परदेशी कमाईबद्दल बोलायचे झाल्यास तर हा चित्रपट ८० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. सुमारे १३० कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ५४० कोटींचा आकडा ओलांडला आहे.
Chhaava Box Office: शाहरुख खानलाही भारी पडतोय विकी कौशल, किंग खानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमालाही छावाने टाकलं मागे
या सिनेमात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही भूमिका दाखवल्या आहेत. या सिनेमात रश्मिकाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय तर अक्षयने औरंगजेब साकारलाय. याशिवाय अनेक मराठी कलाकारांनीही महत्वाची कामगिरी छावा सिनेमात बजावली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय.