Chhaava Movie Box Office Collection : सध्या सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची चर्चा असून या सिनेमाने १४व्या दिवशी बक्कळ कमाई केली आहे. जाणून घेऊया सिनेमाच्या कमाईबद्दल.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या सर्व चित्रपटांसाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच भरघोस कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा विक्रम मोडणं हे आता येणाऱ्या जवळजवळ सर्व चित्रपटांसाठी कठीण लक्ष्य असेल. या चित्रपटाने आतापर्यंतच्या अनेक टॉप चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच वेळी, १४ व्या दिवशी, या चित्रपटाने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या १४ व्या दिवसाच्या कमाईचा (७.७५ कोटी रुपये) आकडा ओलांडला आहे.
‘छावा’ने १४ व्या दिवशी १२ कोटींची कमाई केली
‘छावा’ हा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची कथा आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने १४ व्या दिवशी म्हणजे गुरुवारी १२.०० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने देशभरात ३९८.२५ कोटी रुपये कमावले आहेत.
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाने आतापर्यंत ५५५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर परदेशातून होणारी कमाई आता ८० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट सहजपणे ६०० कोटी रुपयांचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.
Chhaava Movie Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चंच राज्य ; अनेक सिनेमांचे मोडले रेकॉर्डस, देशभरात केली ३९८.२५ कोटींची कमाई
‘छावा’ सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली असून आशुतोष राणा सेनापती हंबीराव मोहिते यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे.