पुष्पा २ ही 'छावा' समोर पडला फिका! १५ दिवसांत छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित सिनेमाची छप्परफाड कमाई

Chhaava Box Office Report: गेले १५ दिवस छावा सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. आता या सिनेमाने पुष्पा २ चा पण रेकॉर्ड मोडलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर यांचा ‘छावा’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. गेल्या १५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करून या चित्रपटाने इतिहास रचला आहे. ‘छावा’ हा २०२५ मधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. पण १५ दिवसांनंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झालीय. असे असूनही १५ दिवसांनी विकी कौशलचा चित्रपट दुहेरी अंकात कमाई करत आहे. ‘छावा’ने तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच रिलीजच्या १५ व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊ.

Archana Joglekar: एक फॅन, एक ऑटोग्राफ अन् क्षणात करिअर बरबाद, एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या अर्चना जोगळेकर अचानक झाल्या गायब
‘छावा’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली. ‘छावा’ने दुसऱ्या आठवड्यात १८६.१८ कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, ‘छावा’ चित्रपटाने २ आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण ४११.४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, जर आपण विकी कौशल स्टारर चित्रपटाच्या १५ व्या दिवसाबद्दल बोललो तर सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ने १५ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी १३.४२ कोटी रुपये कमावले आहेत. १५ दिवसांनंतर, ‘छावा’ ने भारतात एकूण ४२४.८८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Sayali Sanjeev चे टीव्हीवर कमबॅक, सोबत दिसणार स्टार प्रवाहचा लोकप्रिय नायक, पुरस्कारांच्या प्रोमोत दिसली झलक
‘छावा’चे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन

निर्मात्यांनी गेल्या शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) ‘छावा’चा जगभरातील कलेक्शन शेअर केले. निर्मात्यांच्या मते, विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने १४ दिवसांत जगभरात ५५५.३ कोटी रुपये कमावले आहेत.

‘छावा’ ने ‘पुष्पा २’ ला मागे टाकले

कमाईत घसरण झाली असली तरी, ‘छावा’ने तिसऱ्या शुक्रवारी हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट तिसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे, त्याने दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा २ द रुलला मागे टाकले आहे. या यादीत त्याने पहिले स्थान मिळवले आहे. सॅकॅनिल्कच्या मते, पुष्पा २ ने तिसऱ्या शुक्रवारी ११.३ कोटी रुपये कमावले होते.

Chhaava Box Office Collection: पुष्पा २ ही ‘छावा’ समोर पडला फिका! १५ दिवसांत छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित सिनेमाची छप्परफाड कमाई

‘छावा’ बद्दल

‘छावा’ हा ऐतिहासिक काळातील अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे जो मराठा साम्राज्याचे दुसरे शासक संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे, यात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीवर आधारित हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा, अक्षय खन्नासारखे कलाकार आहेत.

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

chhaava box office collection day 15chhaava movie box office reportchhaava movie world wide collectionpushpa 2 box office collectionछावा बॉक्स ऑफिस कलेक्शनछावा मुव्ही बजेटछावा विकी कौशलछावा सिनेमाछावामधील मराठी कलाकारविकी कौशल छावा सिनेमा
Comments (0)
Add Comment