आया रे तूफान! विकी कौशलने प्रभासलाही टाकलं मागे; 'बाहुबली'पेक्षा वरचढ ठरला 'छावा' सिनेमा

Chhaava Box Office Collection Day 16: रीलिजनंतर १६ दिवसांनी किती झाली आहे ‘छावा’ सिनेमाची एकूण कमाई?

हायलाइट्स:

  • ‘छावा’ सिनेमाने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड
  • विकी कौशलचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतोय
  • १६ दिवसांचे कमाईचे आकडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमामधून अभिनेता विकी कौशल बॉक्स ऑफिसवर अधिराज्य करतो आहे. १४ फेब्रुवारी रोजी रीलिज झालेला हा सिनेमा गेले १६ दिवस बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर सिनेमाने दणक्यत कमाई सुरू ठेवली आहे. तिसऱ्या आठवड्याची सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाची कमाई १३ कोटी रुपये झाली होती, शनिवारी या कमाईमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, शनिवारी सुरुवातीची आकडेवारी अशी आहे की, १ मार्च रोजी या चित्रपटाने २१ कोटींचा गल्ला कमावला. ही सुरुवातीची आकडेवारी असल्याने यामध्ये वाढ होऊ शकते. शनिवारी झालेल्य २१ कोटींच्या कमाईनंतर ‘छावा’चे भारतातील नेट कलेक्शन कमाई ४३३.५० कोटींवर गेले आहे. शनिवारी झालेली पूर्ण कमाईची आकडेवारी अद्याप येणे बाकी आहे, शिवाय रविवारीदेखील यामध्ये वाढ होऊ शकते. परिणामी तिसरा वीकेंडदेखील ‘छावा’ गाजवणार असे चित्र आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २१९.२५ कोटींचा गल्ला कमावला. आठवड्याच्या कामाच्या दिवसात कमाई वरखाली होत राहिली तरी, वीकेंड आणि सुट्ट्यांचा या चित्रपटाला कमालीचा फायदा झाला. दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी जमवता आहे. तिसरा आठवडा सुरू होताच अवघ्या २ दिवसात चित्रपटाची कमाई ५० कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.

राज ठाकरेंसाठी ‘छावा’ सिनेमाचा स्टार विकी कौशलची खास पोस्ट; Video शेअर करत मानले आभार

वाचा ‘छावा’ची प्रत्येक दिवसाची कमाई

दिवस १ (पहिला शुक्रवार)- ३१ कोटी रुपये
दिवस २ (पहिला शनिवार)- ३७ कोटी रुपये
दिवस ३ (पहिला रविवार)- ४८.५ कोटी रुपये
दिवस ४ (पहिला सोमवार)- २४ कोटी रुपये
दिवस ५ (पहिला मंगळवार)- २५.२५ कोटी रुपये
दिवस ६ (पहिला बुधवार)- ३२ कोटी रुपये
दिवस ७ (पहिला गुरुवार)- २१.५ कोटी रुपये
दिवस ८ (दुसरा शुक्रवार)- २३.५ कोटी रुपये
दिवस ९ (दुसरा शनिवार)- ४४ कोटी रुपये
दिवस १० (दुसरा रविवार)- ४० कोटी रुपये
दिवस ११ (दुसरा सोमवार)- १८.५७ कोटी रुपये
दिवस १२ (दुसरा मंगळवार)- १८.५ कोटी रुपये
दिवस १३ (दुसरा बुधवार)- २३ कोटी रुपये
दिवस १४ (दुसरा गुरुवार)- १३.२५ कोटी रुपये
दिवस १५ (दुसरा शुक्रवार)- १३ कोटी रुपये
दिवस १६ (तिसरा शनिवार)- २१ कोटी रुपये (सुरुवातीचा अंदाज)
एकूण कमाई- ४३३.५० कोटी रुपये

बड्या चित्रपटांना टाकले मागे

४३३.५० कोटींच्या कमाईनंतर ‘छावा’ सिनेमाने ‘बाहुबली: द बिगिनिंग (२०१५) या सिनेमाला मागे टाकले आहे. प्रभासच्या या सिनेमाची कमाई ४२१ कोटी रुपये झाली होती. याशिवाय ‘२.०’ (२०१८), ‘सलार पार्ट १’ (२०२३), ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (२०२२) अशा बड्या चित्रपटांनाही ‘छावा’ने मागे टाकले आहे.

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

baahubali the beginning lifetime recordchhaava box office collection day 16chhaava movie wordlwide box office collectionChhaava surpasses baahubali the beginningछत्रपती संभाजी महाराजछावा बॉक्स ऑफिस कलेक्शनछावा बॉक्स ऑफिस कलेक्शन अपडेटरश्मिका मंदाना विकी कौशल सिनेमालक्ष्मण उतेकरविकी कौशल छावा सिनेमा
Comments (0)
Add Comment