Today 3 March Numerology | आजचे अंकभविष्य, 3 मार्च 2025: करिअरमधील बदल फायदेशीर, प्रोजेक्टमध्ये भागिदारी लाभदायक ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य | Maharashtra Times

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकज्योतिष : 3 March 2025

Aajche Ank bhavishya, 3 March 2025: वार सोमवार आणि विनायक चतुर्थी आहे. आज शंभोमहादेव आणि गणपती बाप्पा दोघांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या सोबत असेल. मूलांक 1 सह या मूलांकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. मूलांक 5 सह या मूलांकांना मेहनतीचे फळ मिळणार आहे तसेच आर्थिक स्थिती उत्तम असेल. मूलांक 8 सह या मूलांकांना आव्हानांचा सामना करावा लागणार आहे पण काळजी नसावी तुम्ही संकटावर उत्तम प्रकारे मात कराल. दरम्यान तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

मूलांक 1: मेहनतीचे फळ मिळणार, संकटांचा सामना कराल

आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेवून येणार आहे. तुम्ही जी काही मेहनत घेतली आहे त्यात तुम्हाला यश मिळेल. मेहनतीचा फळ मिळतेच यावर तुमचा विश्वास बसेल. नवीन प्रोजेक्ट्समध्ये यश मिळणार असून तुमचे कौतुक होणार आहे. तुमच्या नेतृत्व क्षमतेन तुम्ही सगळ्यांना प्रभावित करणार आहात. दरम्यान एखादी अनपेक्षित घटना तुमच्या योजनांमध्ये अडथळा आणू शकते. तुम्ही घाबरु नका तुमचा आत्मविश्वास अफाट आहे त्यामुळे तुम्ही संकटांवर मात करणार आहात. तब्येतीची काळजी घ्या आणि आहारावर लक्ष ठेवा.

मूलांक 2 : हुशारीसह समजूतीने वागा, संकटे कमी होतील

आजचा दिवस तुमच्या भावनिक असेल पण भावनेच्या भरात वाहत जावू नका. एखादा जुना वाद किंवा अडचणी तुमच्या मानसिक शांततेत तुम्हाला त्रास देणार आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असून तुम्ही थोडं धैर्य आणि समजूतीने वागलात तर कामातील अडथळे दूर होतील. तुम्ही हुशारी आणि संयमाने सगळ्या संकटांवर मात करु शकता. मानसिक तणापासून बचाव करण्यासाठी योग किंवा ध्यान धारणा करा.

मूलांक 3: आर्थिक स्थिती उत्तम

आजचा दिवस सकारात्मक आणि लाभदायक आहे. कोणत्यातरी महत्त्वाच्या कामात यश मिळेल आणि यासंदर्भात तुम्ही जे काही विचार मांडलेले आहेत त्याची सगळीकडे प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीतही फायदा असून आत्मविश्वासात वाढेल. घरात आनंदाचे वातावरण असून कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करणार आहे. तब्येतीत सुधारणा असून कोणत्याही कामाचा ताण घेवू नका

मूलांक 4: क्रिएटीव्ह कामे करणार

आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मचिंतन आणि क्रिएटीव्हीटीने भरलेला आहे. काही जुनी कामे तुम्ही पुन्हा नव्याने सुरु करणार आहात, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. ऑफिसच्या कामात काही आव्हाने येण्याची शक्यता आहे. दरम्यान तुम्ही मेहनतीवर ठाम राहा. तुम्ही प्रामाणिकपणाने मार्गक्रमण करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या प्रकारे विचार करा आणि नंतरच पुढे पाऊल टाका. तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 5: नवीन संधी मिळणार, लाभ घ्या

आज दिवसभर तुम्ही बिझी असणार आहात. नवीन योजना बनवण्यासाठी वेळ मिळेल आणि तुमच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रवासाचा योग असून त्यात लाभ आहे. तुमचा संपर्क दांडगा असून तुम्हाला या माध्यमातून नवीन संधी मिळेल. तुमच्या कामात किंवा व्यवसायात काहीतरी नवीन करायला हवं तर तुम्हाला उत्तम यश मिळेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या. तब्येतीच्या बाबतीत सतर्क राहा. तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 6: कुटुंबातील मतभेद दूर होतील

आजचा दिवस तुमच्यासाठी नातेसंबंध आणि कुटुंबाच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण असेल. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि जुने मतभेद कमी होतील. कामामध्ये थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल, पण तुम्ही मेहनतीने आणि हुशारीने त्यावर मात कराल. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे पण अनावश्यक खर्च होणार आहेत. मानसिक शांतता राखा आणि तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 7: संयम ठेवा, यश नक्की मिळेल

आज तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा दिवस आहे. एखादी जुनी समस्या किंवा वाद सोडवण्यासाठी तुम्हाला सखोल विचार करावा लागेल. कामात यश नक्की मिळेल पण धैर्य आणि संयम हवा. मानसिकदृष्ट्या थोडं थकल्यासारखं वाटेल त्यासाठी आराम करणे गरजेचे आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा. तब्येतीची काळजी घ्या आणि मानसिक शांती – समाधान कायम राहील असा प्रयत्न करा.

मूलांक 8: आव्हानांचा सामना करणार

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आहे. कामात अडथळे आणि समस्या येऊ शकतात, पण मेहनत आणि धैर्याने त्या दूर कराल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीमधून लाभ मिळले. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना उत्तम लाभ मिळेल. तुम्हाला आर्थिक योजनेवर लक्ष देण्याची गरज आहे. कामे वाढत आहे त्याकडे लक्ष द्या. घरात वातावरण आनंदी आणि समाधानी असेल.

मूलांक 9: वादविवादापासून दूर राहा

आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेवून येणार असून उत्साहाला उधाण येणार आहे. तुम्ही एखाद्या नवीन विचार किंवा प्रकल्पावर काम करण्याची योजना आखणार आहात. ऑफिसमध्ये खूप मेहनत आहे तसेच तुमच्या कामाचा गौरव होणार आहे. कुटुंबात सुखी आणि आनंदी वातावरण असेल. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून स्वतःचा बचाव करा. आर्थिक बाबतीत सतर्क राहा आणि काही छोटे – मोठे खर्च होणार आहेत. तब्येतीच्या बाबतीत काळजी घ्या तसेच तुमची दिनचर्या टेन्शन फ्री ठेवण्याचा प्रयत्न करा.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

3 मार्च 2025 कसा असेल माझा दिवस?Numerology Horoscope In Marathi 3 March Today's Numerology 3 March prediction January in marathiअंक ज्योतिष दैनिक भविष्यवाणीआजचा शुभ अंक 3 मार्च 2025आजचे अंकज्योतिष 3 मार्च 2025कोणते अंकशास्त्र भाग्यवान आहे? व्यवसायात नफा होईल?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?व्यवसायात नफा होईल?
Comments (0)
Add Comment