बाहुबलीच्या संपूर्ण कमाईच्याही पुढे गेला छावा, नवीन सिनेमेही रिलीज होताच डब्बाबंद

Chhaava Box Office Collection: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने १७ व्या दिवशी मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने ‘बाहुबली’च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे.

हायलाइट्स:

  • विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने १७ व्या दिवशी चांगली कमाई केली आहे.
  • ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ ने रविवारी खूपच कमी कमाई केली आहे.
  • मात्र, ‘छावा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटासमोर लोकांवर ‘क्रेझी’ची क्रेझ दिसून आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ या चित्रपटाने १७ दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. हा चित्रपट २०२५ चा पहिला सुपरहिट भारतीय ऐतिहासिक अ‍ॅक्शन चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. छत्रपती संभाजीं महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने जीव ओतला आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीवर आधारीत असून त्याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. तर गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेले ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ आणि ‘क्रेझी’ हे चित्रपट या चित्रपटासमोर टिकून राहण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतायत. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. ३१ कोटींची दणदणीत ओपनिंग असलेल्या या चित्रपटाच्या कमाईत १७ व्या दिवशीही घसरण झाली नाही. रविवारी या चित्रपटाने भरघोस कमाई केली आणि आता त्याने देशभरातील बाहुबलीच्या लाइफटाइम कलेक्शन (४२१) पेक्षा जास्त कमाई केली आहे.

रवीनाच्या दत्तक मुलींशी कशी वागते सख्खी लेक? स्वत:च म्हणालेली- ‘त्या आल्या की आमचे दोन गट…’
‘छावा’ ने जगभरात ४५९.५० कोटींची कमाई केली

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने १७ व्या दिवशी २५ कोटी रुपये कमावले आहेत. १६ व्या दिवशी म्हणजे शनिवारी, चित्रपटाचे कलेक्शन सुमारे २२ कोटी रुपये होते, जे त्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी उत्तम आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ४५९.५० कोटी रुपये कमावले आहेत.

‘छावा’ ने जगभरात ६२० कोटींचा टप्पा ओलांडला

जर आपण जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटाची कमाई ६०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. या चित्रपटाने १९ दिवसांत जगभरात ५९४.५० रुपये कमावले आहेत. तर परदेशात शनिवारपर्यंत ७५.०० कोटी रुपये जमा झाले आहेत. आता रविवारी, म्हणजे १७ दिवसांत, सिनेमाने ६२० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

बॉलिवूडचा महाफ्लॉप मुव्ही, सिनेमाचं बजेट ४५ कोटी पण कमावले अवघे ३७६७० रु, विकली फक्त २९३ तिकीटं !
‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ ने सुमारे १.८२ कोटींची कमाई केली

दरम्यान, रीमा कागती दिग्दर्शित ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगली प्रशंसा मिळाली आहे. हा चित्रपट महाराष्ट्राजवळील मालेगाव शहरातील तरुणांच्या वास्तविक जीवनातील कथेवर आधारित आहे, त्यांनी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असताना, विडंबनात्मक चित्रपट बनवून मालेगावमध्ये एक लघु चित्रपट उद्योग उभारला. पण तरीही या चित्रपटाला थिएटरमध्ये विशेष प्रतिसाद मिळत नाहीये. या चित्रपटाने आतापर्यंत जेमतेम १.८२ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने पहिल्या रविवारी फक्त ०.६३ कोटी रुपये कमावले.

‘क्रेझी’ने रविवारी १.५० कोटी रुपये कमावले

याशिवाय, गिरीश कोहलीचा ‘क्रेझी’ हा चित्रपट गेल्या आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित झाला, त्यात सोहम शाह, निमिषा सजयन, टिनू आनंद, शिल्पा शुक्ला, उन्नती खुराणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा डॉ. अभिमन्यू सूद (सोहम शाह) बद्दल आहे, जो एक चांगला सर्जन असतो. एकदा तो शस्त्रक्रिया करत असताना एका टीनएजरचा जीव जातो. त्याच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप लागलेला असतो. आता कथेची सुरुवात होते ती ५ कोटी रुपयांपासून जी अभिमन्यू ऑपरेशनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या टीनएजरच्या कुटुंबाला न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी देणार असतो, पण त्या दरम्यान बरेच काही घडते. चित्रपटाची कथा वेगळी आहे आणि लोकांना ती आवडली आहे. या चित्रपटाने रविवारी १.५० कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच त्याने ३.८५ कोटी रुपये कमावले आहेत.

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

chhaava box office collection day 17chhaava box office reportchhaava movie controversychhaava movie cross baahubali collectionछावा औरंगजेबछावा चित्रपट मराठी कलाकारछावा विकी कौशलछावा सिनेमाछावा सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शनबाहुबली बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment