Weekly Prediction, 3 to 9 March 2025 : 3 ते 9 मार्च दरम्यान वृषभ, मेष,तुळ,धनु या राशींसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा आहे. मेष राशीला गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल तर वृश्चिक राशीच्या लोकांनी त्यांच्या जीवनातील नव्या अध्यायासाठी या सप्ताहात तयार रहावे. चला तर पाहूया मेष ते मीन राशीसाठी हा सप्ताह कसा असेल.
मेष – नवीन गुंतवणूक करताना सावध रहा
हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवात आणि ताकद घेऊन येत आहे.मनातील भीती आणि संकोच सोडून नव्या दिशेने तुम्हाला याकाळात पाऊल टाकावे लागेल.तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे.तसेच कोणत्याही नवीन प्रयत्नात काळजीपूर्वक निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा.आर्थिक बाबतीत नवीन योजना किंवा गुंतवणूक सुरू होऊ शकते परंतु यामध्ये सावधगिरी बाळगा.भाग्यशाली रंग :वांगी भाग्यशाली अंक : 3
वृषभ – अध्यात्मिक प्रगती होईल
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जीवनात आध्यात्मिक आणि पारंपारिक मार्गदर्शनाची गरज भासू शकते.तुम्हाला गुरु किंवा मार्गदर्शकाची मदत देखील मिळू शकते. याकाळात तुम्हाला तुमचे जुनाट विचार आणि परंपरांचा पुनर्विचार करावा लागेल.काही प्रकरणांमध्ये पारंपारिक पद्धती किंवा समुपदेशनाचा अवलंब करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नातेसंबंधात स्थिरता आणि समंजसपणा आवश्यक असेल. तुमच्या कृतीत संयम ठेवा. भाग्यशाली रंग : नारंगीभाग्यशाली अंक : 11
मिथुन – कष्टाचे फळ मिळेल
या आठवड्यात तुम्हाला भरघोस यश आणि विजय मिळण्याची चिन्हे आहेत.तुम्ही केलेली मेहनत आणि संघर्षाचे फळ तुम्हाला मिळेल. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी जिद्दीने काम करावे लागते.तुमच्यामध्ये असलेल्या सामर्थ्य आणि धैर्याच्या साहाय्याने तुम्ही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकता.तुमच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे.परंतु कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका.भाग्यशाली रंग : काळाभाग्यशाली अंक : 7
कर्क – नातेसंबंधात सुसंवाद ठेवा
या आठवड्यात तुमच्या नात्यात समर्पण, सुसंवाद आणि तुमची साथ या गोष्टींची गरज असेल. यावेळी तुम्हाला तुमच्या मनाचे ऐकावे लागेल आणि तुमच्या कोणत्याही नातेसंबंधात सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर तुम्ही जोडीदार शोधत असाल तर नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात. तुमच्या नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि सुसंवादाला महत्त्व द्या. यावेळी तुमच्या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.भाग्यशाली रंग :पिवळा भाग्यशाली अंक : 9
सिंह – आंतरिक शक्ती वाढेल
या आठवड्यात तुम्हाला धैर्य, संयम आणि आत्मविश्वास मिळेल. कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी याकाळात तुम्हाला तुमची आंतरिक शक्ती वापरावी लागेल. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीने आणि संयमाने कोणत्याही आव्हानाचा सामना करावा लागतो. नात्यात किरकोळ अडचणी येऊ शकतात, पण त्या सोडवण्याची क्षमता तुमच्याकडे असेल.आत्मविश्वासाने तुम्ही सर्व गोष्टींवर मात करू शकता. भाग्यशाली रंग :हिरवा भाग्यशाली अंक : 15
कन्या – विचारपूर्वक निर्णय घ्या
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जीवनातील परिस्थितीकडे नव्या दृष्टीकोनातून पाहावे लागेल. तुमचा दृष्टीकोन बदलायला हवा. या काळात तुम्हाला तुमच्या कामात थोडासा व्यत्यय येऊ शकतो. परंतु या परिस्थितीमध्ये तुम्ही जे अंदाज बांधाल ते महत्त्वाचे ठरु शकतात. या आठवड्यात तुम्हाला अतिशय धीराने काम करावे लागेल तसेच घाई न करता प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक पुढे जा.भाग्यशाली रंग :तपकिरीभाग्यशाली अंक : 12
तूळ – महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील
हा आठवडा तुम्हाला न्याय देणारा असेल. तसेच याकाळात तुम्हाला समतोल साधता येईल. कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणात तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल.यावेळी तुम्हाला तुमचे काम प्रामाणिकपणे आणि न्यायाचे पालन करुन करावे लागेल. तुमचे कोणतेही कायदेशीर प्रकरण सुरु असेल तर यावेळी तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. नात्यातही समता आणि सुसंवाद राखण्याची गरज आहे. तुमच्या निर्णयांचा प्रभाव दीर्घकाळ राहील, त्यामुळे विचारपूर्वक पावले उचला. भाग्यशाली रंग : करडा भाग्यशाली अंक : 2
वृश्चिक – जीवनातील नवा अध्याय सुरु होईल
तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय संपून नवीन अध्याय सुरू होणार आहे. हा बदल नकारात्मक नसून चांगल्या गोष्टी घडताना दिसतील. नवीन संधींचा मार्ग शोधण्यासाठी तुम्हाला आता जुने संघर्ष किंवा समस्या सोडून द्याव्या लागतील. ही वेळ तुमच्यासाठी स्वावलंबी बनण्याची आणि नव्या दिशेने पाऊल टाकण्याची आहे. नात्यात किंवा कामात मोठा बदल होऊ शकतो, पण हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.भाग्यशाली रंग : सोनेरी भाग्यशाली अंक : 8
धनु – आनंद, यश आणि प्रशंसा मिळेल
या आठवड्यात तुम्हाला आनंद आणि यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांचे परिणाम सकारात्मक असतील. याकाळात तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह तुमच्या आयुष्यात नवीन उमेद आणेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल,आणि कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा आणि संधींचा काळ आहे. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनात पुढे जा.भाग्यशाली रंग : पांढरा भाग्यशाली अंक : 1
मकर – नात्यात गोडवा येईल
या आठवड्यात तुमच्या जीवनात सुख समृद्धी, प्रेम असेल. तसेच प्रगतीचे संकेत सुद्धा आहेत. हा आठवडा तुमच्यासाठी सर्जनशीलता आणि मूलभूत गरजा संतुलित करण्यासाठी आहे. तुम्हाला तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरावी लागेल. कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्यात गोडवा येईल आणि तुम्हाला तुमच्या कामात यशही मिळेल. याकाळात तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वोत्तम मार्गाने कार्य कराल.भाग्यशाली रंग : नीळा भाग्यशाली अंक : 10
कुंभ – स्वप्ने सत्यात उतरतील
या आठवड्यात तुमच्या जीवनात आशा, विश्वास आणि सकारात्मकता असेल. तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. तुम्हाला यशाची चिन्हे दिसू लागतील, यावेळी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि आशा कायम ठेवावी लागेल. याकाळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. नात्यातही सकारात्मक ऊर्जा असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदी वेळ घालवाल.भाग्यशाली रंग : लालभाग्यशाली अंक : 6
मीन – आत्मपरीक्षणाची गरज
या आठवड्यात तुमच्या आयुष्यात थोडाफार गोंधळ होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या परिस्थिती किंवा ठराविक व्यक्तीबद्दल संपूर्ण योग्य माहिती मिळवावी लागेल. आपल्या निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा आणि सर्व तथ्य जाणून घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नका. तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची आणि गैरसमज दूर करण्याची हीच वेळ आहे. नात्यात स्पष्टता ठेवा आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळा.भाग्यशाली रंग : गुलाबीभाग्यशाली अंक : 5