Chhaava Box Office: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ या चित्रपटाने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १९ दिवस उलटून गेले आहेत तरी चित्रपटगृहांमध्ये अजूनही त्याचा धुमाकूळ सुरू आहे.
हायलाइट्स:
- विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांच्या कमाईला मागे टाकले आहे.
- १३० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने आधीच ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
- ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ चित्रपटगृहातून गायब झाला आहे आणि ‘क्रेझी’ शेवटच्या टप्प्यात आहे.
‘छावा’ने १९ व्या दिवशी ५.५० कोटींची कमाई केली.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ने १९ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी ५.५० कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच, चित्रपटाने आतापर्यंत ४७२.०० कोटींची कमाई केली आहे.
‘छावा’ ने जगभरात किती कमाई केली?
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट ६४० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात सुमारे ७८ कोटी रुपये कमावले आहेत.
Chhaava Box Office Collection : १९ व्या दिवशी विकी कौशल चक्क अमिताभ बच्चन यांनाही पडला भारी, छावाचा कल्कीच्या कमाईलाही धक्का
गिरीश कोहलीचा ‘क्रेझी’ चित्रपटगृहांमध्ये टिकून
रीमा कागती दिग्दर्शित ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ या चित्रपटाचा थिएटरमधून पत्ता कट झाला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या गिरीश कोहलीच्या ‘क्रेझी’ चित्रपटाने पहिल्या मंगळवारी सुमारे ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. एकूणच, या चित्रपटाने आतापर्यंत ४.८२ कोटी रुपये कमावले आहेत.