कर्क राशीचे मनोबल उंचावेल ! मकर राशीला व्यवसायातील बदल फायदेशीर ठरतील पाहा, तुमचे राशिभविष्य | Maharashtra Times |

वृषभ राशीला नोकरीच्या ठिकाणी सावध राहावे लागेल तर कन्या राशीला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील तसेच मेष राशीला लोकांवर अंध विश्वास ठेवून चालणार नाही मग बघा तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत आजचा तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य 6 मार्च 2025

आजचे राशिभविष्य : Today’s Horoscope 6 मार्च 2025 In Marathi : 6 मार्च 2025 रोजी तुमच्या राशीवर करिअर,कौटुंबिक जीवन,आर्थिक तसेच सामाजिक बाबतीत कसा प्रभाव पडेल.तुमची राशी काय सांगते?आजच्या दिवसात काय होणार? मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य.

मेष – अंध विश्वास ठेवू नका

बुद्धिमत्ता आणि ज्ञान वापरून आज तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न कराल. तुमच्या प्रयत्नांचा तुम्हाला फायदा होईल व कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये अन्यथा फसवणूक होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचाही आशीर्वाद मिळेल. बऱ्याच काळापासून जर मानसिक तणावाचा सामना करत असाल तर आज तुम्हाला त्यातून आराम मिळेल.आज नशीब ९१% तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा तिलक लावावा.

वृषभ – नोकरीच्या ठिकाणी सावध रहा

नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला आज थोडे सावधानतेने रहावे लागेल. तुमच्या कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनी संदर्भात आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करु शकता.आज सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सामाजिक परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.आज संध्यकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये महिला मित्राच्या मदतीने चांगली बातमी ऐकायला मिळेल.आज नशीब ७६% तुमच्या बाजूने राहील. ब्राह्मणाला दान द्या.

मिथुन – परीक्षेत यशस्वी व्हाल

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. परदेशात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी जर कोणती परीक्षा दिली असेल तर आज त्यात ते यशस्वी होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून कोणत्याही अपेक्षा आज ठेवू नका निराशा पदरी पडेल. आज संध्याकाळी तुम्ही कुटुंबीयांसह देवाच्या दर्शनासाठी जाऊ शकता. जीवनावश्यक दैनंदिन वस्तूंची खरेदी आज तुम्ही कराल. आज नशीब ९७% तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वती किंवा उमा यांची पूजा करा.

कर्क – मनोबल उंचावेल

नोकरीच्या ठिकाणी एखादे महत्वपूर्ण काम तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीने संध्याकाळपर्यंत पूर्ण कराल. आज तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण करुनच दाखवाल त्यामुळे तुमचे मनोबल देखील वाढेल.आज केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही समस्या असतील तर आज त्यांचे निराकरण होऊ शकते. आज नशीब ९१% तुमच्या बाजूने असेल. गरिबांना कपडे आणि अन्न दान करा.

सिंह – भागीदाराची चौकशी करा

व्यवसायात जर एखाद्याला भागीदार बनवायचे असेल तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवून कोणाकडून सल्ला घ्या अन्यथा तो भागीदार भविष्यात तुमचा विश्वासघात करू शकतो. आज तुमचे खर्च वाढू शकतात त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज कुटुंबातील लहान मुलांचे हट्ट तुम्ही पूर्ण कराल. तुमच्या वडिलांना डोळ्यांशी संबंधित समस्या असल्यास आज ती वाढू शकते त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.आज नशीब ७९% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या कपड्यात हरभरा डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा.

कन्या – विचारपूर्वक निर्णय घ्या

व्यवसायातील कामात आज अधिक व्यस्त असाल. तुमचे कायदेशीर काम फार काळ पुढे ढकलू नये अन्यथा तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर सर्व चौकशी करूनच तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून निर्णय घ्या. लव लाईफ जगणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कुटुंबीयांची साथ मिळेल.आज नशीब ८२% तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालिसा पठण करा.

तुळ – वाद मिटतील

मनात कोणाबद्दलही चुकीचे विचार येणे टाळावे लागेल. सासरच्या एखाद्या व्यक्तीशी तुमचा वाद झाला असेल तर आज तुम्हाला तो मिटवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज नोकरीत तुमच्या इच्छेनुसार काम मिळाल्याने तुमच्या सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो.आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह शुभकार्यात सहभागी होऊ शकता.आज नशीब ६८% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करा.

वृश्चिक – गोड बोलून काम करा

व्यवसायात आपले काम काढून घेण्यासाठी थोडे गोड बोलावे लागेल.आज जर तुम्हाला एखाद्याच्या बोलण्याने वाईट वाटले तरी तुम्ही त्यांच्यावर रागावू नका तरच तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकाल.आज एखादी समस्या उद्भवली तर त्याला धैर्याने सामोरे ज्याण्याचा प्रयत्न करा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता मात्र आपला खिसा पाहून खर्च करा. आज नशीब ७९% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.

धनु – पगारवाढ होईल

मुलांच्या शिक्षणासंबंधी समस्यांमुळे आज चिंतेत असाल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज पगारवाढीसारखी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुमच्या नोकरी, कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये कोणताही वाद निर्माण झाला तर तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल.आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मनाचे ऐकावे लागेल त्यामुळे कोणाच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका.आज नशीब 86% तुमच्या बाजूने असेल. पांढऱ्या चंदनाचा तिलक लावून तांब्याच्या भांड्यातून शिवाला जल अर्पण करा.

मकर – व्यवसायातील बदल फायदेशीर ठरणार

आज तुमचा व्यवसाय थोडा मंद असल्याने तुम्ही थोडे चिंतेत असाल. वडिलांचा सल्ला घेऊन व्यवसायात काही नवीन बदल केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत कामातील काही कारणांमुळे तुमचा वाद होऊ शकतो मात्र प्रकरण वाढू न देता तुम्ही सामंजस्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. कामात आज नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. आज संध्याकाळी तुम्हाला कडवट गोष्टी ऐकायला मिळतील. आज नशीब ८३% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.

कुंभ – चिंता सतावेल, मित्राचा सल्ला घ्यावा

भविष्याबाबत काही गोष्टींमुळे संभ्रमात असल्याने आज तुमची चिंता वाढेल. चिंतामुक्त होण्यासाठी एखाद्या जवळच्या मित्राचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्या नवीन व्यवसायसंदर्भात काही सांगायचे असेल तर आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी जर कामात बदल झाले तर ते स्वीकारून त्यानुसार काम करणे प्रगतीचे ठरेल. आज तुम्ही धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. रोज रात्री शिल्लक भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्या.

मीन – सकारात्मक विचार करा

आज मनाला नकारात्मक विचार येण्यापासून तुम्हाला थांबवावे लागेल तरच तुम्ही सर्व काम सहज पूर्ण करू शकाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज रोखीचा तुटवडा जाणवू शकतो त्यामुळे गैरसोय होईल. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. एखाद्याला सल्ला देण्यापूर्वी त्याचे नुकसान होणार नाही ना याचा नक्की विचार करा. सासरच्या लोकांकडून आज भेटवस्तू मिळू शकते.आज नशीब ९५% तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करावे.

लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे प्रिंट,आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहे. विविध विषयांवर क्रिएटिव्ह लेख, स्क्रिप्ट लिहिण्याचा उत्तम अनुभव आहे. आध्यात्मिक, धार्मिक विषयांसोबतच कला, संस्कृती, सिनेमा, सोशल, राजकारण, क्राईम अशा विविध विषयांवर आधारित लेखन केले आहे. डिजिटल माध्यमासाठी स्क्रिप्ट लिहून व्हॉइसओवर दिले आहेत. ट्रॅव्हल करायला आवडत असल्याने अनेक ट्रॅव्हल स्टोरीज लिहिल्या आहेत.आणखी वाचा

Source link

6 मार्च 2025 दैनिक राशिभविष्यAajche Rashi Bhavishya 6 मार्च 2025daily rashi bhavishya 6 मार्च 2025today daily horoscope in marathitoday rashifal 6 मार्च 2025Todays Prediction 6 मार्च 2025 In marathiआजचे राशी भविष्यतुमची राशी काय सांगते?
Comments (0)
Add Comment