कन्या राशीला नोकरीच्या संधी मिळणार तर सिंह राशीचे लोक नवीन प्रोजेक्ट सुरु करणार तसेच कर्क राशीची प्रतिष्ठा मानसन्मान वाढणार, मग बघा तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष – मन प्रसन्न राहील

आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. घरातील सदस्यांसोबत तुमचा वाद झाला असेल तर तोही आज संपेल आणि तुम्ही सगळे एकत्र याल. आज तुम्ही तुमच्या मुलाशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल निराश होऊ शकता त्यामुळे तुम्ही थोडे तणावात रहाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे दिसते. आज तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करण्यात यशस्वी व्हाल.आज नशीब ७८% तुमच्या बाजूने असेल. पिठाचे गोळे माशांना खायला द्यावे.
वृषभ – धार्मिक कार्यात व्यस्त रहाल

राजकारणात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना आज यश मिळेल. तसेच त्यांना राजकारणात पुढे जाण्याची आज संधी मिळेल आणि लोकही त्यांना पाठिंबा देतील. बोलण्यात मात्र गोडवा ठेवावा लागेल. तुमच्या आईची तब्येत आज बिघडू शकते त्यामुळे तब्बेत जास्त नाजूक वाटली तर डॉक्टरांना जरूर दाखवा. आज तुम्हाला सत्ताधाऱ्यांसोबतच्या युतीचाही फायदा होताना दिसत आहे. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मंदिरात जाऊन पूजापाठ करू शकता. आज नशीब ९३% तुमच्या बाजूने असेल. हनुमानजींना सिंदूर अर्पण करा.
मिथुन – प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल
नोकरीच्या ठिकाणी जर वरिष्ठांशी काही काळापासून वाद असेल तर आज तो मिटेल आणि तुम्ही तुमच्या कामावर देखील लक्ष केंद्रित करु शकाल. विनोद करताना आज थोडे सावध रहा तुमच्या विनोदाने एखाद्याचे मन दुखावू शकेल. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता.आज नशीब ७७% तुमच्या बाजूने असेल. विष्णु सहस्त्राचा पाठ करा.
कर्क – मानसन्मान, प्रतिष्ठा वाढेल
आजच्या दिवसातील थोडा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घालवाल. तुमच्या मित्रांसोबत आज तुम्ही एखाद्या कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता. तसेच आज एखाद्या सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. आज तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. आज तुम्ही तुमच्या मुलांची जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत मजामस्ती करण्यात खेळण्यात आज थोडा वेळ घालवाल. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आज विकसित होईल.आज नशीब ९६% तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.
सिंह – नवीन प्रोजेक्ट सुरु कराल
व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्याचा आजचा दिवस असेल. व्यवसायात काही प्रोजेक्ट्स बनवण्यात अडथळे येत असतील तर आज तुमचा प्रोजेक्ट सुरू करू शकता यश मिळेल. नवीन प्रोजेक्टचा तुम्हाला फायदा होईल त्यामुळे याबाबत इतर कोणाचेही मत घेऊ नका. अन्यथा तुम्हाला तोटा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि कुटुंबातील एखाद्या सदस्याला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळाल्याची बातमी ऐकायला मिळेल. आज निष्कारण तुम्ही चिंतेत असाल मात्र तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्ही यातून बाहेर पडाल. आज नशीब ६७% तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.
कन्या – नोकरीच्या संधी मिळतील
नोकरीच्या,रोजगाराच्या संधीच्या शोधात असाल तर आज चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. घरातील कुटुंबातील सदस्यांसमोर तुमचे मत व्यक्त करण्यात आज संकोच करण्याची गरज नाही. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.आज तुमच्या मुलांसाठी नवीन काम करून आनंदी व्हाल मात्र तुम्हाला तुमच्या कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.आज नशीब ७१% तुमच्या बाजूने असेल. शिवनाम जपमाळा करा.
तुळ – शत्रूंपासून सावध रहा
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक व्यवहाराबाबत काही अडचणी येत असतील तर आज त्या समस्या दूर होतील. तसेच एखाद्या ठिकाणी तुमचे अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात. तुमच्या प्रगतीमुळे तुमचे शत्रू नाराज होतील आणि तुमच्या विरुद्ध कटकारस्थाने करू शकतील त्यामुळे आज तुम्हाला थोडे सावध रहावे लागेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन बनवू शकता.आज नशीब ६१% तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा.
वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा
आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण तुमच्या असभ्य वर्तनामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एखाद्याकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा कारण आज तुम्हाला पैसे मिळण्यासाठी अडचणी येतील. आज तुमच्या कुटुंबात एखाद्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा होऊ शकते ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा सहवास आवश्यक असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य नाही.आज नशीब ८५% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडूचा नैवैद्य अर्पण करा.
धनु – विरोधक प्रशंसा करतील
आज तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करतील त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र तुम्हाला तुमचे शत्रू ओळखावे लागतील कारण ते तुमचे मित्रही असू शकतात. आज तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल पण लाभ होऊ शकणार नाही. आज तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर खर्च कराल. आज संध्याकाळी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत कठोर परिश्रम करावे लागतील तरच त्यांना यश संपादन करता येईल.आज नशीब ८९% तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा
मकर – प्रयत्नांना यश मिळेल
आज तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळेल. मात्र तुम्हाला तुमच्या बिझनेस पार्टनरचा सल्ला देखील घ्यावा लागेल. नोकरदार लोकांना आज कोणत्याही वाद किंवा भांडणापासून दूर राहावे लागेल अन्यथा त्यांना अडचणींना सामोरे जाल. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा खर्च वाढेल. तुमच्या मुलाला एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल.आज नशीब ९४% तुमच्या बाजूने असेल. पिवळ्या वस्तू दान करा.
कुंभ – प्रभाव आणि वैभव वाढेल
आजचा दिवस हा तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. परंतु आज तुम्हाला व्यवसायात काही शत्रूमुळे नुकसान होऊ शकते. परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही तुमचे रोजचे खर्च भागवू शकाल. मात्र खर्च वाढले असतील तर तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून विश्वासघात होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आज तुम्ही एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला तुमच्या कामासाठी विनंती केली असेल तर तुमचे सरकारी काम सहज पार पडेल.आज नशीब ९८% तुमच्या बाजूने असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
मीन – उधारी देऊ नका
आज जर तुम्ही जवळच्या व्यक्तीला पैसे उधार दिले तर तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तुम्हाला पैशांचा कोणताही व्यवहार करायचा असेल तर तुमच्या जोडीदाराशी सल्लामसलत केल्यानंतरच करा. आरोग्याच्या समस्यांमुळे आज तुम्हाला तुमचा प्रवास पुढे ढकलावा लागेल. आज तुम्ही तुमच्या वडिलांशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलू शकता.आज नशीब ६६% तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा.