Numerology Prediction, 8 March 2025 : शनिवार असून बजरंगबली हनुमान यांची कृपादृष्टी तुमच्यावर असेल. त्याचबरोबर आयुष्यमान आणि रवि योग असून त्याचे शुभ परिणाम सर्व मुलांकावर असणार आहेत. मूलांक 1 साठी रिलॅक्स मूड असेल. मूलांक 3 चे जातक प्रियजनांसोबत दिवस मजेत घालवतील. मूलांक 5 साठी महत्त्वाच्या भेटीगाठी होणार आहेत त्याचा फायदा भविष्यात होईल. मूलांक 8 चे लोक दुपारनंतर कामात व्यस्त राहणार तर मूलांक 9 साठी दिवस उत्तम असून प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल. चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
आयुष्यमान आणि रवि योगासह शनिवार आहे तसेच शनिवार अंजनीसूत हनुमान यांना समर्पीत असून तुमच्या कामातील अडचणी नक्की दूर होतील. मूलांक 1 सह या मूलांकासाठी दिवस उत्तम असून मानसिक समाधान मिळेल. मूलांक 6 सह या मूलांकाच्या जातकांनी ब्रेक घेणे गरजेचे आहे. सतत काम करुन मेंदू थकून जातो, तुम्हाला आरामाची गरज आहे. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.
मूलांक 1 – रिलॅक्स मूड, ताणतणाव कमी होणार

मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही अगदी रिलॅक्स मूडमध्ये असणार आहात. ताणतणाव कमी झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. लोकांसोबत तुमचा संपर्क वाढेल. तसेच काही सामाजिक कामांमध्ये सहभागी होणार आहात.
मूलांक 2 – कामाच्या अनेक संधी मिळतील

मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून कामाच्या बाबतीत अनेक संधी मिळतील त्याचा लाभ घ्या. कुटुंबाा एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी तुम्हाला काही कार्य करावं लागेल ते करा. घरात काही धार्मिक कार्यावर चर्चा होणार आहे.
मूलांक 3 – प्रियजनांसोबत दिवस मजेत जाणार
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून मित्र परिवार आणि प्रियजन यांच्यासोबत व्यतीत होणार आहे. प्रवासाचा योग असून त्यातून लाभ होईल. तब्येतीची काळजी घ्या आणि आहाराकडे कटाक्षाने लक्ष द्या.
मूलांक 4 – महत्त्वाची कामे मार्गी लागणार
मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून प्रत्येक कामात कुटुंबाची साथ आणि आशीर्वाद असेल. तुमची कामे पटापट मार्गी लागतील. काही महत्त्वाचे कामे आज पूर्ण होणार आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी रिलॅक्स वाटेल.
मूलांक 5 – महत्त्वाच्या भेटीगाठी होतील
मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून प्रियजनांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भेटीगाठी होणार आहेत. कामाचा व्याप वाढतो आहे तुम्ही नियोजन आणि व्यवस्थापन याकडे लक्ष द्या.
मूलांक 6 – स्वतःसाठी वेळ काढा
मूलांक 6 असलेल्यांसाठी दिवस खूप बिझी असणार आहे. पण तुम्ही थोडा ब्रेक घ्यायला हवा कारण अती काम तुमचा त्रास वाढवेल. थोडं स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
मूलांक 7 – कुटुंबातील तणाव कमी होणार
मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. कुटुंबात सुरु असणारे तणावाचे वातावरण आता कमी होणार आहे. थोडासा आराम मिळाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. एखाद्या विशेष व्यक्तीसोबत भेट होईल. याचा फायदा भविष्यात नक्की होणार आहे.
मूलांक 8 – दुपारनंतर कामात व्यस्त राहणार
मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दुपारनंतर तुम्ही कामात जास्त व्यस्त राहणार आहात. एखाद्या महिलेकडून तुम्हाला उत्तम लाभ होईल. घराता वातावरण सुख समाधानाचे असेल. आर्थिक स्थिती सुधारते आहे.
मूलांक 9 – प्रत्येक कामात नशिबाची साथ
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी दिवस चांगला असून प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ असेल. आई-वडिल तसेच नातेवाईकांसोबत संबंध अधिक दृढ होतील. तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी आज मिळेल. कामे वाढत आहेत तुम्ही नियोजन नीट करा. तुमचे रखडलेले पैसे मिळणार आहेत.