बुधादित्य राजयोगाचा या राशींना होणार फायदा ! तुमचे टॅरो कार्ड काय सांगतात पहा |Maharashtra Times|

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Mar 2025, 6:16 pm

बुधादित्य राजयोग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रभावी होणार आहे. वास्तविक, या आठवड्यात सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. जेथे बुध आधीच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग अनेक राशींना या आठवड्यात लाभ, प्रगती आणि यशाच्या संधी प्राप्त करून देणार आहे. तसेच या आठवड्यात होळीचा सण देखील अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बुधादित्य राजयोगाच्या स्थितीत मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेष फलदायी ठरणार असल्याचे टॅरो कार्डचे गणित दाखवत आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप आनंद मिळेल. याशिवाय कौटुंबिक जीवनातही आनंद वाढणार आहे. अशा परिस्थितीत मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल ते जाणून घेऊया. साप्ताहिक टॅरो कुंडली वाचा सविस्तर…

वृषभ – नशिबाची साथ मिळेल

टॅरो कार्डच्या गणनेनुसार हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन बदल आणि संधी घेऊन येणार आहे. होळीचा सण आनंद आणि नवीन नातेसंबंध घेऊन येईल.जुने प्रलंबित प्रश्न सुटू शकतात आणि कामात अचानक यश मिळू शकते. नशीब तुमच्या सोबत आहे पण मेहनत करत रहा.

Priyanka Londhe – 1600×900 (5)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला असल्याचे टॅरो कार्ड्सचे गणित दाखवत आहे. या काळात, नवीन नातेसंबंध तयार होतील आणि तुमचे वैयक्तिक जीवन सुधारेल.घरी पाहुणे अचानक येतील. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल आणि व्यवसायात सुद्धा फायदा होईल.

कर्क – पालकांचे सहकार्य मिळेल

टॅरो कार्डच्या वाचनानुसार या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि सामाजिक बाबतीत सक्रिय राहावे लागेल. होळीचा सण प्रेम आणि अध्यात्मिक प्रगती घेऊन येईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुमच्या पालकांचे सहकार्य मिळेल. सकारात्मक विचार ठेवल्याने याकाळात नक्की फायदे मिळू शकतात.

सिंह – धाडसी निर्णयांचा फायदा होईल

टॅरो कार्ड्सच्या वाचनानुसार या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांचे सामाजिक संपर्क वाढतील आणि ते उत्साही सुद्धा राहतील. होळीच्या काळात मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढेल. नातेवाईकांमध्ये तुमचे महत्त्व वाढेल. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून लाभ मिळू शकतात. तसेच या आठवड्यात तुम्हाला धाडसी निर्णयांचा फायदा होईल.

कन्या – कामाचा ताण राहील

टॅरो कार्ड सांगतात होळीचा हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. व्यवसायात नफा वाढेल आणि नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. जुन्या मित्रांशी अनेक दिवसांनी बोलून छान वाटेल. घरातील वातावरण चांगले राहील आणि नातेवाईकांचे याकाळात येणे-जाणे चालू राहील. कामाचा ताण राहील. आठवड्याच्या शेवटी सहलीचे नियोजन केले जाऊ शकते.

तूळ – मेहनतीचे फळ मिळेल

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अपेक्षांनी भरलेला असेल असे टॅरो कार्ड सांगत आहेत. होळीमुळे तुमच्यात सकारात्मक बदल घडतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रगती होईल. आशावादी राहा आणि विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने पुढे जा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल दिसेल.

वृश्चिक – शत्रुत्व दूर होईल

टॅरो कार्ड सांगतात वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. होळीच्या दिवशी जुन्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. एखाद्यासोबत असेलेले शत्रुत्व दूर होईल आणि याकाळात चवदार भोजनाचा आनंद मिळेल. नवीन संधींचा लाभ घ्या आणि न घाबरता पुढे जा.

धनु – कुटुंबातील महिलांची साथ मिळेल

टॅरो कार्डनुसार हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल. होळीमुळे नवीन संधी मिळतील आणि नशिबाची जोरदार साथ मिळेल. नव्या,जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील.महिलांना कुटुंबातील सासू, वहिनी यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घ्याल. नवीन मार्ग खुले होऊन जीवनात आनंद येईल.

मकर – कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतील

टॅरो कार्ड्सनुसार हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी समृद्धी आणि प्रगती आणणारा असेल. होळी तुम्हाला सर्जनशीलता देईल आणि प्रेमाने भरून टाकेल. कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करण्याची ही वेळ चांगली आहे.नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची चिन्हे आहेत. प्रेमाने आणि सांभाळून काम करा. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवाल.

कुंभ – मानसिक स्थिती अस्थिर होईल

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल असे टॅरो कार्ड सांगत आहेत. एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आल्याने मन दुःखी होईल. होळीच्या काळात मानसिक स्थिती थोडी अस्थिर होऊ शकते. याकाळात तुम्हाला तुमच्या मनातील भावनांना समजून घेऊन त्यांचा योग्य विचार करावा लागेल. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आहाराची काळजी घ्या.

मीन – आनंदाची बातमी मिळेल

टॅरो कार्ड सांगत आहेत की मीन राशीच्या लोकांना याकाळात गोष्टींमध्ये थोडे संतुलन राखावे लागेल. होळीचा सण तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख घेऊन येईल. याकाळात नवीन मित्र बनू शकतात. एखादी चांगली बातमी मिळाल्याने होळीचा आनंद वाढेल. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

Source link

Tarot CardTarot horoscope weekly 10 to 16 marchTarot horoscope weekly in marathiटॅरो कार्ड भविष्यटॅरो कार्ड भविष्य मराठीतटॅरो कार्ड रिडींगसाप्ताहिक टॅरो कार्ड 10 ते 16 मार्च
Comments (0)
Add Comment