वृषभ राशीला मिळणार नशिबाची साथ तर कन्या राशीला होणार भागीदारीत नफा तसेच मेष राशीला जीवनातील नवीन बदल ठरणार लाभदायक मग बघा तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष – नवीन बदल लाभदायक ठरतील

आजच्या दिवशी तुम्ही स्वतःचे काम सोडून इतरांच्या कामात त्यांना मदत करण्यात व्यस्त रहाल मात्र यामुळे तुमच्या कामाचे नुकसान होऊ शकते लक्षात ठेवा. कामाच्या पद्धतीत केलेले बदल आजच्या दिवशी लाभदायक ठरतील.जोडीदाराची तब्बेत बिघडू शकल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असेल. मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कौटुंबिक कलह जर सुरु असतील तर तुम्ही तुमच्या गोड वागण्याने ते सोडवण्यात यशस्वी व्हाल.आज नशीब ८४% तुमच्या बाजूने असेल. मुंग्याना पीठ घाला.
वृषभ – नशिबाची साथ मिळेल

आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करू शकाल. यामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. आज काही मुलांना परीक्षेचा निकाल चांगला न लागल्याने किंवा नापास झाल्याने त्रास होऊ शकतो.आज तुम्ही तुमच्या कामावर नियंत्रण ठेवाल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.आज नशीब ६६% तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालिसा पठण करा.
मिथुन – वाहनांपासून सावध रहा
ज्यागोष्टीची खूप दिवसांपासून वाट पाहत होता ती मौल्यवान गोष्ट तुम्हाला एखाद्या उच्च अधिकारी किंवा तुमच्या आईवडिलांच्या कृपेने मिळेल. आज रात्रीच्या वेळी भरधाव वाहनांपासून सावध राहावे लागेल अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे एखाद्याच्या ठिकाणी फिरायला जात असाल तर काळजी घ्या. पैशांची चिंता सतावत असेल तरी देखील आज कोणाकडूनही उधार घेऊ नका. तसेच मुलांच्या अनावश्यक खर्चामुळे देखील थोडे चिंतेत असाल.आज नशीब ७२% तुमच्या बाजूने राहील. सूर्यदेवाला अर्घ्य द्या.
कर्क – आनंदाची बातमी समजेल
परदेशात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांकडून आज तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या बहिणीचे लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर आज त्या संपतील आणि बहिणीचे लग्न निश्चित होऊ शकते त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण असेल . आज तुमच्या राजकीय प्रतिष्ठेत वाढ होईल मात्र कोणताही निर्णय घाईघाईने आणि भावनेच्या भरात न घेता केवळ तुमच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्या तरच तुम्ही यश मिळवू शकाल. आज मोठा नफा झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल.आज नशीब ९२% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात हरभरा डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा.
सिंह – राजकारण्यांना अभूतपूर्व यश मिळेल
आज राजकारणाशी संबंधित लोकांना अभूतपूर्व यश मिळू शकते ज्यामुळे त्यांची प्रगती होईल.आज तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी झाल्याने तुमच्या मनावरील ओझेही हलके होईल. आज रात्रीचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत हसत-खेळत घालवाल. तब्बेतीला नुकसान होईल असे खाणे टाळा अन्यथा भविष्यात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. परिश्रमानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळत असल्याचे दिसते. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब ९३% तुमच्या बाजूने असेल. सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करावे.
कन्या – भागीदारीत नफा होईल
आज तुमच्या मनात जर एखादी कल्पना आली तर ती लगेच अंमलात आणा फायदा होईल. पूर्वी सुरु केलेल्या भागीदारीतील व्यवसायात आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या कामात आज तुम्ही आनंदाने रस घेऊन काम कराल आणि कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सुद्धा सहभागी होऊ शकता. आज तुमचा संध्याकाळचा वेळ भविष्यातील प्लॅनिंगवर चर्चा करण्यात जाईल.आज नशीब ८२% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.
तुळ – जोडीदाराला सरप्राईज द्याल
आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात चांगली बातमी घेऊन येत आहे. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात धावपळ करावी लागू शकते त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा वायरल आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात उत्पन्नाचे एखादे नवीन साधन मिळेल. आजच्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सरप्राईज गिफ्ट आणि पार्टीचे प्लॅनिंग कराल. आज नशीब ६५% तुमच्या बाजूने राहील. श्री गणेश चालिसा पठण करा.
वृश्चिक – कीर्ती वाढेल
आज तुमची कीर्ती वाढेल. घरातील सदस्यांमधील वादामुळे भांडणाची परिस्थिती उद्भवली असेल तर तुम्ही शांत राहून बोलण्यात गोडवा ठेवणे चांगले राहील. अन्यथा कुटुंबातील काही सदस्यांना तुमच्या धडक बोलण्याचे वाईट वाटेल. आज तुम्ही तुमची संध्याकाळ मित्रांसोबत मजेत घालवाल. परदेशातून व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.आज नशीब ७१% तुमच्या बाजूने राहील. पांढऱ्या चंदनाचा तिलक लावून तांब्याच्या भांड्यातून महादेवाच्या पिंडीला जल अर्पण करा.
धनु – कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील
आज घरात नवीन वस्तू खरेदी कराल. दैनंदिन गरजेच्या सामानावर आज खर्च होईल. मात्र तुमचा खर्च आज तुम्हाला सांभाळून करावा लागेल नाहीतर बजेट बिघडू शकते. कोर्टाशी संबंधित एखादे सरकारी काम असेल तर ते आज पूर्ण न झाल्याने कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील त्यामुळे तुम्ही थोडे त्रस्त राहाल. नोकरीत असणाऱ्या लोकांचा एखादा सहकारी आज त्यांच्याविषयी बॉसचे कान भरत असल्याने त्यांना त्या गोष्टीचा तणाव येऊ शकतो. आज नशीब ७३% तुमच्या बाजूने राहील. गायींना गूळ खाऊ घाला.
मकर – सासरच्या लोकांकडून लाभ होईल
स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन पुढे जा कोणालाही तुमच्या गोष्टींबाबत विचारू नका. आज कुटुंबात शुभकार्याची चर्चा होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी प्लॅन बनवून त्यावर काम करावे लागेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो.आज नशीब ६२% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.
कुंभ – पगारवाढ व बढती होईल
सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज आनंदाची बातमी मिळाल्याने ते खुश होतील. सरकारी नोकरीतील लोकांचे पगारवाढ आणि बढती सुद्धा होण्याची शक्यता आहे. तुमच्या आईला आज डोळ्यांशी संबंधित त्रास होऊ शकतो काळजी घ्या. आज संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचा विचार करत असाल तर त्यातील सर्व बाबी गांभीर्याने तपासा अन्यथा भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते.आज नशीब ६९% तुमच्या बाजूने राहील. बजरंग बाणचा पाठ करा.
मीन – प्रॉपर्टी सौदा करताना पालकांचा सल्ला घ्या
कौटुंबिक जीवनात एक नवीन अनुभूती येऊन तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम आणखी वाढेल. आज विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव संपताना दिसत आहे. आज संध्याकाळी मित्रांसोबत हँग आउट करताना तुम्हाला एखादी महत्वाची गोष्ट समजेल जी तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.आज तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज तुम्ही प्रॉपर्टीचा कोणताही सौदा करत असाल तर नक्कीच तुमच्या पालकांचा सल्ला घ्या.आज नशीब ८९% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करा.