Numerology Prediction, 9 March 2025 : रविवारचा दिवस मूलांक 1 साठी जबाबदारी वाढविणार आहे. मूलांक 4 असणाऱ्या जातकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. मूलांक 6 असणाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवावे तसेच वादविवादापासून दूर रहावे. तर
मूलांक 9 च्या लोकांनी कामाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहणे सोडून द्यायला हवे. चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – जबाबदारी वाढणार, कामाला वेग येईल

मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. काही नवीन सुरु करायचे असेल तर वेळ उत्तम आहे. तुमच्या कामात गती येईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील.
मूलांक 2 – स्वतःहून काही बदल करणार

मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून धनलाभाचे योग आहेत. काही बदल करण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेणार आहात. तुमच्या इच्छेनुसार काम करू शकणार आहात. ताणतणाव कमी असेल, मानसिक समाधान मिळेल.
मूलांक 3 – घरातील आजारपणामुळे ताण वाढेल
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुमचा ताण वाढेल. तुम्हाला आर्थिक मदत घ्यावी लागेल आणि ती मिळणार आहे. घरातील वातावरण शांत आणि समाधानी राहील असा प्रयत्न करा.
मूलांक 4 – आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते आहे
मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून पैशांची चणचण आज कमी होणार आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला समस्येतून वाचवू शकेल. कोणाची तरी मदत मिळेल त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील.
मूलांक 5 – तब्येतीची काळजी घ्या
मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, जर डायबिटीज किंवा थायरॉइडची समस्या असेल तर नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. आहार आणि आराम याकडे लक्ष ठेवा. जंक फूड खाणे कमी करा. आठ तासांची झोप घेणे गरजेच आहे.
मूलांक 6 – रागावर नियंत्रण ठेवा
मूलांक 6 असलेल्यांसाठी दिवस ठिक आहे पण काही बाबतीत चढ-उतार आहेत. कोणतेही निर्णय घेताना राग डोक्यात ठेवू नका किंवा भावनेच्या भरात वाहत जावून निर्णय घेवू नका. संयम आणि शांत राहून कामे केली तर ती पटकन होतील. वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा.
मूलांक 7 – बदल तुमच्यासाठी सकारात्मक असतील
मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे काही बदल होणार आहेत ते तुमच्यासाठी उत्तम असतील. मुलांबद्दल तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार आहात. तुमच्या कामात प्रगती असून घरातील कामे देखील पटापट मार्गी लावणार आहात.
मूलांक 8 – नवीन गुंतवणूक लाभदायक
मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला आहे. मित्रत्वाच्या नवीन संधी तुमच्यासमोर येतील. हे नवे मित्र तुम्हाला भविष्यात मदत करतील. वाहनाशी संबंधित समस्या दूर होतील. नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणार आहात ज्या लाभदायक असतील.
मूलांक 9 – इतरांवर अवलंबून राहणे सोडून द्या
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. प्रियजनांसोबत संबंध अधिक चांगले होणरा आहेत. ज्या काही गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या कमी होतील. तुमच्या कामात इतरांवर अवलंबून राहणे सोडून द्या. लक्षात ठेवा काही गोष्टी तुम्हालाच करायच्या आहेत. जोश आणि उत्साहात काम करा, मेहनतीचे फळ मिळणार आहे.