आजचे राशिभविष्य 11 मार्च 2025 : मेष राशीला नोकरीत प्रमोशन मिळणार ! वृषभ राशीला मान-प्रतिष्ठेचा लाभ होईल ! पाहा, तुमचे राशिभविष्य

मेष राशीला नोकरीत प्रमोशन मिळणार तर वृषभ राशीला मान-प्रतिष्ठेचा लाभ होईल तसेच मिथुन राशीला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल तर कन्या राशीला कामात यश मिळेल. मग बघा तुमची राशी काय सांगते? भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला कोणते उपाय करावे लागणारचला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आजचे राशिभविष्य : Today’s Horoscope 11 मार्च 2025 In Marathi : 11 मार्च 2025 रोजी तुमच्या राशीवर करिअर,कौटुंबिक जीवन,आर्थिक तसेच सामाजिक बाबतीत कसा प्रभाव पडेल.तुमची राशी काय सांगते?आजच्या दिवसात काय होणार? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क रहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार त्यामुळे मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य जाणून घ्या.

मेष – नोकरीत प्रमोशन मिळेल

आजचा दिवस तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणारा असेल. आज कामात तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते. आज कोणताही वादविवाद झाला तर जास्त भावनिक होऊ नका अन्यथा समोरची व्यक्ती तुमच्या भावनिकतेचा फायदा घेईल.व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आज भागीदाराशी वाद होऊ शकतो. संध्याकाळी जोडीदारासोबत सासरच्या लोकांना भेटायला जाल.
आज नशीब ९३% तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.

वृषभ – मान-प्रतिष्ठेचा लाभ होईल

सामाजिक कार्याशी संबंधित लोकांना आज सामाजिक क्षेत्रात आदर सन्मान मिळेल. कुटुंबात जर काही दिवसांपासून वाद सुरु असतील तर आज ते मिटून तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. आज घरात पूजेचे आयोजन कराल. आज एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही काळ थांबणे चांगले होईल अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मान-प्रतिष्ठेचे भरपूर लाभ होताना दिसत आहेत.
आज नशीब ६४% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.

मिथुन – आरोग्याकडे लक्ष द्या

आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजी केल्यास भविष्यात मोठ्या आजाराला निमंत्रण मिळू शकते. आज जर कोणतेही शारीरिक दुखणे जाणवल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा. व्यवसायात आर्थिक नफा कमी झाल्यामुळे आज तुम्हाला थोडा मानसिक तणाव येईल. आज जर तुम्ही असभ्य वागलात तर त्याचा कुटूंबाला त्रास होऊ शकतो. तुमच्या वडिलांसोबत आज तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यातील काही प्लॅन्सबाबत चर्चा कराल.
आज नशीब ७६% तुमच्या बाजूने राहील. योग प्राणायाम करा.

कर्क – अपेक्षित नफा मिळेल

आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडा वेळ एकांतात घालवाल. यामुळे तुमच्यातील वाद, गैरसमज संपुष्टात येईल आणि एकमेकांवरील प्रेम आणखी वाढेल. आज विद्यार्थ्यांना पैशाची कमतरता जाणवू शकते. लहान व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्याने आनंदी असतील. आज तुम्ही तुमच्या आईला भेटवस्तू देऊ शकता.
आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या जपमाळाचा १०८ वेळा जप करा.

सिंह – प्रतिस्पर्ध्यांच्या सल्ला ऐकू नका

आजचा दिवस तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आव्हानांनी भरलेला असेल. मात्र त्यावर तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला काही सल्ला देत असतील तर तो अजिबात ऐकू नका टाळण्याचा प्रयत्न करा कारण ते तुम्हाला चुकीचा सल्ला देण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना आज अशा काही संधी मिळतील ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायातही अपेक्षित नफा मिळाल्याने आनंद होईल.
आज नशीब ८३% तुमच्या बाजूने असेल. भुकेल्या लोकांना अन्न द्या.

कन्या – कामात यश मिळेल

आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुम्ही जे कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्यामुळे तुम्हाला आवडणारे काम करुन या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आज तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी देखील आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. भागीदारीत एखादा व्यवसाय केला असेल तर आज तुम्हाला त्यात चांगला नफा मिळू शकतो.
आज नशीब ८१% तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र दान करा.

तुळ – अडकलेले पैसे मिळतील

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. संध्याकाळी आईच्या तब्येतीबाबत थोडे जागरुक राहावे लागेल. डोळ्यांशी संबंधित काही समस्या असल्यास त्या समस्या वाढू शकतात. आज एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्वतःच्या कामावर लक्ष द्या इतरांच्या कामात डोकवायला जाणे तुमच्यासाठी तोट्याचे ठरेल त्यामुळे काळजी घ्या. मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल.
आज नशीब ९०% तुमच्या बाजूने असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

वृश्चिक – उधारी दिल्यास फसवणूक होईल

आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. आज तुमच्या वरिष्ठांच्या आणि पालकांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी गोष्ट मिळेल. आज विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. आज जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार दिल्यास तो तुमची फसवणूक करू शकतो. यामुळे कोणताही पैशाचा व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला सावध राहावे लागेल.
आज नशीब ८६% तुमच्या बाजूने असेल. गाईला भाकरी खायला द्या.

धनु – व्यवसायातील डील फायनल करा

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल. त्याच्यासाठी तुम्ही पैशांची व्यवस्था करण्यात धावपळ कराल. आज तुमच्या कुटुंबातील खर्च अचानक वाढल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. व्यवसायातील एखादा करार जर आज तुम्ही फायनल केला तर त्याचे भविष्यात खूप फायदे होतील.आज धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुमचा आदर वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील मुलांसोबत मजा करण्यात आजची संध्याकाळ घालवाल.
आज नशीब ७०% तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मीची पूजा करा.

मकर – विवाह प्रस्ताव येतील

आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. भावंडांसोबतचे वाद विवाद सुटल्याने देखील आज तुम्ही खुश असाल. विवाहायोग्य लोकांसाठी आज विवाह प्रस्ताव येतील कुटुंबातील सदस्य या प्रस्तावाला त्वरित मान्यता देऊ शकतात. तुमच्या मुलाला जर परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्याच्यासाठीही आजचा दिवस चांगला असेल. मात्र आज तुम्हाला पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करावा लागेल.
आज नशीब ७३% तुमच्या बाजूने राहील. पिठाचे गोळे माशांना खायला द्यावे.

कुंभ – विश्वासघात होऊ शकतो

आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू आल्याने तुम्ही चिंतेत असाल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास त्यात यश नक्कीच मिळते. प्रेम जीवनात असणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमचा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून विश्वासघात होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आज संध्याकाळी एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा प्लॅन करू शकता.
आज नशीब ८९% तुमच्या बाजूने असेल. हनुमानजींना सिंदूर अर्पण करा.

मीन – मित्रांच्या रूपातील शत्रुंना ओळखा

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील तोट्याचे नफ्यात रूपांतर करण्यात यशस्वी व्हाल त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमचा हेवा करतील. मित्रांच्या रूपातील शत्रुंना ओळखावे लागेल. आज नोकरीत मैत्रिणीच्या मदतीने तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. संध्याकाळी, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. आज तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा.
आज भाग्य ६१% तुमच्या बाजूने असेल. विष्णु सहस्त्राचा पाठ करा.

लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे प्रिंट,आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहे. विविध विषयांवर क्रिएटिव्ह लेख, स्क्रिप्ट लिहिण्याचा उत्तम अनुभव आहे. आध्यात्मिक, धार्मिक विषयांसोबतच कला, संस्कृती, सिनेमा, सोशल, राजकारण, क्राईम अशा विविध विषयांवर आधारित लेखन केले आहे. डिजिटल माध्यमासाठी स्क्रिप्ट लिहून व्हॉइसओवर दिले आहेत. ट्रॅव्हल करायला आवडत असल्याने अनेक ट्रॅव्हल स्टोरीज लिहिल्या आहेत.आणखी वाचा

Source link

11 मार्च 2025 दैनिक राशिभविष्यAajche Rashi Bhavishya 11 मार्च 2025daily rashi bhavishya 11 मार्च 2025today daily horoscope in marathitoday rashifal 11 मार्च 2025Todays Prediction 11 मार्च 2025 In marathiआजचे राशी भविष्यतुमची राशी काय सांगते?
Comments (0)
Add Comment