शिवसेनेने आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला; भाजपचा निशाणा

हायलाइट्स:

  • मानखुर्दच्या उड्डाणपुलाला नाव देण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाने टीकास्त्र सोडले आहे.
  • या उड्डाणपुलाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे योग्य असल्याचे भाजपने म्हटले आहे.
  • शिवसेनेने हिंदुत्व सोडले, मराठीबाणा सोडला आणि आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला; भाजपचा शिवसेनेवर निशाणा.

मुंबई: मानखुर्दच्या उड्डाणपुलाला नाव देण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. या उड्डाणपुलाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे योग्य असल्याचे सांगत शिवसेनेने हिंदुत्व सोडले, मराठीबाणा सोडला आणि आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला अशा शब्दात भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (bjp spokesperson keshav upadhye criticizes shiv sena)

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शिवसेनेवर हा निशाणा साधला आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, तसेच मराठी बाणा देखील सोडला आहे आणि आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे. याचे कारण म्हणजे या उड्डाणपुलाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे योग्य आहे. अण्णाभाऊ साठे हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आवाज आहे. असे असताना ख्वाज गरीब नवाज यांचे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना आहे, याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले आहे.

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे नवा उड्डाणपूल उभार राहत असून या पुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईनुद्दीन चिश्ती- अजमेर) याचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हा उड्डाणपूल छेडानगर ते मानखुर्द असा होत आहे. ही मागणी तारीक उल्मा-ए-अहले सुन्नत या संस्थेने केल्याचे खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या अर्जात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- कोल्हापुरकरांची चिंता वाढली; अजित पवार, राजेश टोपे घेणार करोनास्थितीचा आढावा

छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम धर्मियांची आहे, असे शेवाळे यांनी म्हटले आहे. या उड्डाणपुलास सुफी संत असलेले ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन समस्त मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- जालना: अंबड टी पाँइंट येथे बस-जीपचा भीषण अपघात, महिला ठार, ८ गंभीर जखमी

विश्व हिंदू परिषदेला हवे अण्णाभाऊ साठेंचे नाव

उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये विश्व हिंदू परिषदेचे मागणीपत्र जोडले आहे. यात या उड्डाणपुलाला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या परिसरात मातंग समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणावर राहत असून ते लोकशाहीर अण्णाभाऊंचे अनुयायी आहेत. स्थानिकांच्या भावनांचा आदर करून या उड्डाणपुलाला अण्णाभाऊंचे नाव द्यावे अशी मागणी चेंबूर जिल्हा विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- दारुबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र

Source link

Annabhau Sathebjp criticizes shiv senaKeshav Upadhyeकेशव उपाध्येख्वाजा गरीब नवाजभाजपची शिवसेनेवर टीकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे
Comments (0)
Add Comment