Chhaava Box Office Collection: विकी कौशलच्या छावा या सिनेमाने २६ व्या दिवसांत पदार्पण केले आहे. या सिनेमात विकीच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. जाणून घेऊ सिनेमाने किती कमाई केली.
‘छावा’ ने २६ व्या दिवशी किती कमाई केली?
‘छावा’ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहात आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. उर्वरित स्टारकास्टच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे.
यासोबतच, ‘छावा’ चौथ्या आठवड्यातही भरपूर कमाई करत आहे. २५ व्या दिवशी, या चित्रपटाने गदर २ च्या संपुर्ण कलेक्शनला मागे टाकले. आता छावा सिनेमाच्या संपुर्ण कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास,
‘छावा’ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपये कमावले होते.
दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १८०.२५ कोटी रुपये कमावले.
तर तिसऱ्या आठवड्यात ‘छवा’ने ८४.०५ कोटी रुपये कमावले होते.
२२ व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन ८.७५ कोटी रुपये होते.
चित्रपटाने २३ व्या दिवशी १६.७५ कोटी रुपये कमावले.
‘छावा’ने २४ व्या दिवशी १०.७५ कोटी रुपये कमावले.
२५ व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन ६ कोटी रुपये होते.
आता ‘छावा’च्या २६ व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आले आहेत.
सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ने रिलीजच्या २६ व्या दिवशी ५ कोटी रुपये कमावले आहेत. यासह, ‘छावा’ची २६ दिवसांत एकूण कमाई आता ५२९.९५ कोटी रुपये झाली आहे.
‘छावा’ने २६ व्या दिवशी पुष्पा २, पठाणसह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. २६ व्या दिवशीही ‘छावा’ ने उत्तम कलेक्शन केले आहे. यासह, या चित्रपटाने पठाण, स्त्री २, बाहुबली २, उरी, कांतारा, गदर २ यासह अनेक चित्रपटांचा २६ व्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडला आहे आणि सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट बनला आहे.
‘जवान’ने २६ व्या दिवशी ६.६५ कोटी रुपये कमावले.
२६ व्या दिवशी पुष्पा २ ची कमाई ५.५ कोटी रुपये होती.
छावा ने २६ व्या दिवशी ५.१५ कोटींची कमाई केली आहे.
पठाणचे २६ व्या दिवसाचे कलेक्शन ४.१५ कोटी रुपये होते.
स्त्री २ ने २६ व्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली,
Chhaava Box Office Collection : शंभूराजांच्या बलिदान दिनी छावाची बॉक्स ऑफिसवर उत्तुंग भरारी! गदर २ ला ही टाकलं मागे
बाहुबली २ ने २६ व्या दिवशी २.८ कोटी रुपये कमावले होते.
२६ व्या दिवशी गदर २ ची कमाई २.५ कोटी रुपये होती.
केजीएफ चॅप्टर २ ने २६ व्या दिवशी २.३५ कोटी रुपये कमावले होते.