बाहुबली, दंगलचा रेकॉर्ड मोडत ३१ दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर 'Chhaava'ची यशस्वी घोडदौड, कमावला इतक्या कोटींचा गल्ला

Chhaava Box Office Collection Day 31:अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या छावा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ३१ व्या दिवसानंतरही ही कमाई सुरूच आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’चित्रपटानं खऱ्या अर्थानं बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. ३१ दिवसानंतरही सिनेमागृहात प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहे. ३१ दिवशी देखील चित्रपटाची कोट्यवधींची कमाई झाल्याचं पाहायला मिळालं. या ३१ दिवसात अनेक नवीन सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झाले,पण छावा चित्रपटासमोर कोणाचाही टिकाव लागला नाही. एकाही सिनेमाला बॉक्स ऑफिस कमाल दाखवता आली नाहीये.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही पाचव्या रविवारी छावा सिनेमानं कोट्यवधींची कमाई केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटींचा गल्ला जमवला होता. यानंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं १८६.१८ कोटींची कमाई केली . तर तिसऱ्या आठवड्यात चित्रपटानं ८४.९४ कोटींची कमाई केली होती.

चौथ्या आठवड्यात छावा चित्रपटानं ४३.९८ कोटींचा गल्ला जमवला होता. आता ३१ दिवसानंतरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतायत. २९ व्या दिवशी सिनेमानं ७.२५ कोटींची कमाई केली आहे. तर ३० व्या दिवशी सिनेमाच्या तुलनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ३० व्या दिवशी सिनेमानं तब्बल ८ कोटींची कमाई केली होती. तर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार छावा सिनेमानं ३१ दिवशीही तब्बल ८ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.या सिनेमाची एकूण कमाई ही ६७० कोटींच्या जवळपास झाल्याचं म्हटलं जात आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृत आकडे जाहीर केले नाहीयेत.

बापरे! छावा चित्रपटाने २४ दिवसात इतके कोटी कमवले… तर एकीकडे खजिना मिळवण्यासाठी लोकांची नुसती गर्दी
पाचव्या रविवारी मोडला रेकॉर्ड
तर ८ कोटींच्या जवळपास कमाई करत छावा सिनेमा पाचव्या रविवारी सर्वात जास्त कमाई करण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.


चित्रपटांची ३१ व्या दिवसांची कमाई

उरी द सर्जिकल स्ट्राइक – ५.६६ कोटी
स्त्री २ – ५.४ कोटी
पुष्पा २ -४.४ कोटी
तान्हाजी-३.४५ कोटी
बाहुबली २- ३.१६ कोटी
दंगल-२.८ कोटी

या मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड छावा सिनेमानं मोडला असून १३० कोटींच्या जवळपास बजेट असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर महिनाभर राज्य करत कैकपटीने जास्त कमाई केल्याचं समोर येत आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”आणखी वाचा

Source link

box office collection news in marathichhaava box office collection daychhaava box office collection day 31vicky kaushalछावा बॉक्स ऑफिस कलेक्शनछावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २३ वाछावा बॉक्स ऑफिस रिपोर्टछावा मराठी बातम्याबॉक्स ऑफिस कलेक्शनविकी कौशल
Comments (0)
Add Comment