Chhaava Box Office Collection Day 32: ‘छावा’ या चित्रपटाने पाचव्या सोमवारी म्हणजेच १७ मार्च रोजी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे.
हायलाइट्स:
- ‘छावा’ची सर्वात कमी कमाई
- सोमवारी कमावले अवघे २.६५ कोटी
- तरीही मोडला ‘स्त्री २’ आणि ‘पुष्पा २’चा रेकॉर्ड
पाचव्या सोमवारी कमाई घसरली
दरम्यान चित्रपटाच्या सोमवारच्या कमाईत आधीच्या सोमवारच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. ‘छावा’ने पहिल्या सोमवारी २४ कोटी रुपये, दुसऱ्या सोमवारी १८ कोटी रुपये, तिसऱ्या सोमवारी ७.७५ कोटी रुपये आणि चौथ्या सोमवारी ५.२५ कोटी रुपये कमावले होते. तर आता पाव्या सोमवारी ही कमाई २.६५ कोटी रुपयांवर घसरली आहे. सिनेमाने आतापर्यंत केलेली ही सर्वात कमी कमाई आहे. या चित्रपटाने आतापर्यंत हिंदी आणि तेलुगू भाषेमध्ये मिळून ५६५.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, छावा या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली. याशिवाय चित्रपटात दिव्या दत्ता, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, डायना पेंटी हे कलाकारदेखील आहेत. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाल्यापासून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल कामगिरी केली, सिनेमाने अवघ्या २३ दिवसांत भारतात ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या कमाईनंतर २०२५ या वर्षातील हा सर्वात हिट चित्रपट ठरला, शिवाय विकीचाही हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे.