Chhaava Box office Collection: बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. गेल्या महिन्याभरापासून चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आता सिनेमाचं ३६ व्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
सहाव्या शुक्रवारी या सिनेमानं तब्बल २ कोटींच्या वर कमाई केली आहे. छावा या ऐतिहासिक चित्रपटानं खरं तर बॉक्स ऑफिसवरही इतिहास रचला आहे. १३० कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं दुपट्टीनं कमाई केलीय. सहाव्या आठवड्यातही कमाईचे आकडे हे समाधानकारक असेच आहेत. महाराष्ट्रात सिनेमाची अजूनही क्रेझ कायम आहे.
हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे, तर महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना यानं साकारली आहे. विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. तसंच अनेक मराठी कलाकार सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमा दिग्दर्शित केलाय.
आता येणारे आणखी काही दिवस सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकून राहिल असं दिसतंय.
रिलीज नंतर ३६ व्या दिवशी देखील सिनेमाची चांगली कमाई होताना दिसतेय. ३६ व्या दिवशी चित्रपटानं २.१० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं आता छावा सिनेमाची एकूण कमाई ही तब्बल ५७४.९५ कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.
Chhaava चित्रपटाची क्रेझ कायम, ३६ व्या दिवशी केली तब्बल इतक्या कोटींची कमाई, ‘पुष्पा २’चा रेकॉर्डही मोडला
३६ व्या दिवशी मोडले रेकॉर्ड्स
सुरुवातीच्या दिवसांतील कमाई आणि आत्ताची कमाई यात अर्थात मोठं अंतर आहे. कमाईत घट झाली आहे. पण इतर सिनेमांचे रेकॉर्ड्स छावा चित्रपटानं मोडले आहेत. ३६ व्या दिवशी सगळ्यात जास्त कमाईचा पुष्पा २चा रेकॉर्डही छावा सिनेमानं मोडला आहे.
दरम्यान, छावा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत राहिला. या सिनेमामुळं राजकीय वातावरणही तापलं होतं.