Chhaava Box Office Collection Day 48: १४ फेब्रुवारी रोजी रीलिज झालेला ‘छावा’ हा सिनेमा ४८व्या दिवशीही लाखोंची कमाई बॉक्स ऑफिसवर करत आहे. या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली असली तरी जगभरातील कमाईने मोठा रेकॉर्ड रचला आहे.
हायलाइट्स:
- ‘छावा’ने जगभरातील कमाईत रचला मोठा रेकॉर्ड
- ४८ दिवसांत गाठला ८०० कोटींच्या कमाईचा टप्पा
- विकी कौशलच्या चित्रपटाची कमाई घसरली
८०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
‘छावा’ची कमाईने अनेक रेकॉर्ड मोडले असले तरी देशात ६०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी अद्याप ५ कोटी रुपये दूर आहे. सिनेमाच्या जगभरातील कमाईने मात्र जबरदस्त रेकॉर्ड केला. वर्ल्डवाइड या चित्रपटाची कमाई ८०० कोटींवर पोहोचली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाच्या यशात महाराष्ट्रात झालेल्या कमाईचा सर्वाधिक वाटा आहे. १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने हिंदी आणि तेलुगू भाषेत मिळून भारतात ४८ दिवसांत ५९५.३० कोटींचे नेट कलेक्शन केले. असे असले हा सिनेमा अजूनही ‘स्त्री २’ ला मागे टाकून हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट होऊ शकलेला नाही. ‘स्त्री २’ ने ५९७.९९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता, तर ‘छावा’च्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ५७९.४३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
कोट्यवधींवरुन लाखोंच्या आकड्यावर घसरली ‘छावा’ची कमाई
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ने बुधवारी, रिलीजच्या ४८ व्या दिवशी देशात एकूण ४१ लाख रुपयांचा गल्ला जमवला. यापैकी ४० लाख रुपये हिंदी आवृत्तीतून आणि १ लाख रुपये तेलुगू आवृत्तीतून कमावले आहेत. यापूर्वी मंगळवारी आणि सोमवारी अनुक्रमे ५४ लाख रुपये आणि ८९ लाख रुपयांची कमाई झाली होती.
आता ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवरील पकड जवळपास संपली आहे. मीडिया रिपोर्टनपुसार, विकी आणि रश्मिका यांच्या या चित्रपटाने जगभरात ८०० कोटींचा टप्पा गाठण्याचा विक्रम या केला आहे.