Chhaava Box Office : छावा सिनेमा गेली ५० दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. त्यापुढे सलमानच्या सिकंदरलाही शरणागती पत्करावी लागलीय.
या चित्रपटात अक्षय खन्नाने नकारात्मक भूमिका साकारली
विकी कौशलचा हा चित्रपट मराठीसोबत इतर भाषीय प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय होत आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. या सिनेमाची क्रेझ पाहता, तो ७ मार्च रोजी तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ११ एप्रिल रोजी तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले.
‘छावा’चा बॉक्स ऑफिसवर सातवा आठवडा आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा १८०.२५ कोटी रुपये होता, तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ८४.०५ कोटी रुपये कमावले. चौथ्या आठवड्यात हा आकडा ५५.९५ कोटी रुपये होता, तर पाचव्या आठवड्यात तो ३३.३५ कोटी रुपयांवर आणि सहाव्या आठवड्यात १६.३ कोटी रुपयांवर आला. सातव्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन ६.५५ कोटी रुपये होते, त्यापैकी ६.५३ कोटी रुपये हिंदी आणि २ लाख रुपये तेलुगू भाषेतून होते. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे, तर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर त्याच्या कमाईने ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ५० व्या दिवशी या सिनेमाने ५० लाख रुपये कमावले आहे.
छावाचे बॉक्स ऑफिसवर ५० दिवस नाबाद! सिकंदर भुईसपाट, विकी कौशल ठरला बॉक्स ऑफिसचा राजा
या चित्रपटाने सिकंदरला दिली तगडी स्पर्धा
सलमान खानचा सिकंदर प्रदर्शित झाला असला तरी, छावा प्रेक्षकांना अजूनही आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ चित्रपटाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. याचा या अॅक्शन चित्रपटाला खूप फायदा झाला. एकीकडे चाहत्यांना सिकंदरकडून खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या भाईजानच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अवस्था वाईट आहे.