Sunny Deol Jaat Vs Salman Khans Sikandar: सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाने सलमान खानच्या ‘सिकंदर’ला स्पष्टपणे धूळ चारल्याचे चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाले.
३० मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ने १३ व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी फक्त ३० लाख रुपये कमावले. तर, १० एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जाट’ने दुसऱ्या दिवशी ११ एप्रिल रोजी शुक्रवारी ७ कोटी रुपये कमावले. अशा परिस्थितीत कोणाचे पारडे जड आहे, हे स्पष्टपणे दिसून आले. सलमान खानच्या चित्रपटाची सुरुवात दमदार झाली असली तरी, त्यानंतर सिनेमाची कमाई ढेपाळत गेली. त्या तुलनेत, सनी देओलच्या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई काहीच नव्हती. कारण ‘जाट’ने तीन दिवसांत मिळून २६ कोटीचा आकडा गाठला, तर ‘सिकंदर’ने पहिल्याच दिवशी ही कमाई केली होती.
‘जाट’ आणि ‘सिकंदर’ने किती केली कमाई?
‘जाट’ सिनेमाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी सुमारे १० कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जाते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यामुळे या चित्रपटाने तीन दिवसात एकूण २६.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर रीलिनंतर दुसऱ्या शनिवारी सिकंदरचे कलेक्शन जवळपास ४० लाख रुपये आहे. आतापर्यंत ‘सिकंदर’ने १०८.४७ कोटींची कमाई केली आहे. Sacnilk ने याविषयी वृत्त दिले आहे.
या दोन्ही सिनेमांना आगामी काळात अक्षय कुमारच्या ‘केसरी २’चे आव्हान आहे. १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आधीपासूनच चर्चा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यामुळे ‘जाट’ला सलमानपासून धोका नसला तरी, अक्षयचा सिनेमा धोकादायक ठरू शकतो.