Akshay Kumar Kesari 2 Box Office Collection Day 3: अक्षय कुमारच्या ‘केसरी 2’ या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात 30 कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
हायलाइट्स:
- ‘केसरी 2’ची चांगली कमाई
- अक्षय कुमारचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर करतोय कमाल
- ‘जाट’लाही टाकले मागे

रविवारी झाली जबरदस्त कमाई
पहिल्या दिवशी चित्रपटाने 7.75 कोटी रुपये कमावले आणि या सिनेमाविषयी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये चांगला रीव्ह्यू दिसून आला. त्यामुळे वीकेंडला या कमाईत वाढ होईल असे अपेक्षित होते. त्यानुसार शनिवारी दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 09.75 कोटी रुपये कमावले, म्हणजेच पहिल्या दिवसापेक्षा सुमारे 25 टक्के वाढ पाहायला मिळाली. Sacnilk ने याविषयी वृत्त दिले आहे. ‘केसरी 2’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये रविवारी आणखी वाढ असून रविवारी ही कमाई 12.25 कोटी रुपयांवर पोहोतली आहे. अशाप्रकारे, पहिल्या तीन दिवसांचे एकूण कलेक्शन आता 29.75 कोटी रुपये झाले आहे.
अक्षयचा हा सिनेमा ‘सिकंदर’ किवा ‘छावा’प्रमाणे ‘मास अपील’ असणारा चित्रपट नाही, परिणामी देशभरात केवळ 1700 स्क्रीन्सवर तो रीलिज करण्यात आला आहे. असे असले तरीही देशभक्तीपर थीममुळे सिनेमा देशभरातील विविध भागांमध्ये चांगली कमाई करतो आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘केसरी 2’ची स्पर्धा सनी देओलच्या ‘जाट’सोबत आहे. या चित्रपटाच्या कमाईमध्येही रविवारी काही वाढ झाली. असे असले तरी, अक्षयने सनीला रविवारच्या कमाईमध्ये पछाडले आहे. ‘जाट’ने रविवारी सुमारे ५.१५ कोटी रुपये कमावले.
‘केसरी 2’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
दिवस 1 (पहिला शुक्रवार)- 7.75 कोटी रुपये
दिवस 2 (पहिला शनिवार)- 9.75 कोटी रुपये
दिवस 3 (पहिला रविवार)- 12.25 कोटी रुपये
एकूण- 29.75 कोटी रुपये
दरम्यान हा चित्रपट सी. शंकरन नायर यांचे नातू रघु पलात आणि पुष्पा पलात यांनी लिहिलेल्या ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकापासून प्रेरित आहे आणि तो करण सिंग त्यागी आणि अमृतपाल बिंद्रा यांनी लिहिला आहे.