Tej police times
२२८९, न्यु मोदीखाना कॅम्प पुणे येथे फिर्यादीचे परिचयाच्या आरोपी आजम झेन,अशमीर,अनुश उर्फ डोना यांनी आमच्याकडे खुन्नसने काय बघतो असे म्हणुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी पालघन पंच (फायटरने) मारहाण करुन जबर जखमी करुन शिवीगाळ केली,
म्हणुन लष्कर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम३०७, ५०४,३४ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७(१)राह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी लष्कर हद्दीत व परहद्दीत माहिती काढली असता मिळालेल्या माहिती नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे दिमतीत तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सापळा रचुन दाखल गुन्ह्यातील १).डोना उर्फ अनॉष आनंद चंदनशिव वय १८ वर्षे रा.शादाप टॉवर चुडामन तालीम भवानीपेठ पुणे,
२)जैन असगर शेख.वय १८वर्षे रा.शादाप टॉवर चुडामन तालीम ७७५ भवानीपेठ, ३) अशमेर जमीर सैय्यद वर्षे १९ वर्षे रा.भंडारशहा मस्जीद शेजारी, बी.टी.शहाने शाळे समारे चुडामन तालीम भवानीपेठ पुणे यांना अवघ्या २४ तासाच्या आत ताब्यात घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले,
त्यांना न्यायालया समोर हजर करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक
करत आहेत. सदरची कामगीरी ही पोलीस उप आयुक्त सागर पाटील,
सहा.पोलीस आयक्त चंद्रकांत सांगळे यांचे मार्गदर्शना खाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) कालीदास जांभळे यांचे नेतृत्वाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक प्रल्हाद डोंगळ तपास पथकातील पोलीस हवालदार महेश कदम,
दत्तात्रय तेलंगे,मंगल लाकडे,सचिन मांजरे, इम्राण नदाफ, चक्रधर शिरगिरे,पवन भोसले, सागर हुवाळे यांनी केलेली आहे.