पदवी प्रवेशाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

हायलाइट्स:

  • बारावीची परीक्षा रद्द झाल्याने पदवी प्रवेशाबाबत संभ्रम
  • उदय सामंतांनी नागपुरात दिली प्रतिक्रिया
  • लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती

नागपूर : करोना (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच बारावीच्या परीक्षा (12th Exam) रद्द झाल्या. त्यानंतर आता विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशाबाबत (Degree Admission) दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्रवेशावरून विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. बारावीच्या निकालानंतरच प्रवेश प्रक्रियेबाबत विचार होणार असून त्यासाठी राज्यातील सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती तयार केली जाणार आहे. येत्या २४ तासांत यावर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता पाहता नागपूर, रामटेक, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ३० व्हेंटिलेटर्सचे सामंत यांच्या हस्ते सोमवारी वितरण होणार आहे. त्यानिमित्त नागपुरात आले असता विशेष भेटीदरम्यान त्यांनी बारावीनंतर पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली.

Ramdas Athawale: ‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…’; ‘कवी’ आठवले पवारांना म्हणाले…

सामंत म्हणाले, विद्यापीठांमधील पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशाबाबत दोन मतप्रवाह आहेत. एक वर्ग प्रवेशासाठी सीईटीची मागणी करत आहे, तर सीईटी घेतल्याने बारावी निकालावर शंका उपस्थित होईल, असे दुसऱ्या गटाला वाटते. दोन्ही बाजूने विभागाला प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत.

सर्कल स्तरावर परीक्षा केंद्र

आतापर्यंत एमएच सीईटी परीक्षा जिल्हा – तालुका स्तरावर व्हायच्या. यावर्षी करोनामुळे परीक्षा केंद्र सर्कल स्तरावर देण्याचा विचार सुरू आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यांनी सर्कल स्तरावर परीक्षेबाबतचा अहवाल पाठवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

Source link

degree admissionUday Samantउदय सामंतनागपूरपदवी प्रवेश
Comments (0)
Add Comment