(शैलेश चौधरी)
एरंडोल:धरणगाव पी.आर.संस्थेच्या महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ.प्रविण समाधान बोरसे यांनी धरणगाव न्यायालयात प्राचार्य डॉक्टर.तुकाराम श्रीपतराव बिराजदार व विश्वजीत तुकाराम बिराजदार या दोघांविरूध्द
,भा. द. स. कलम ४२०, ४६८, ४६७, ४०६,४०८ सह ३४अन्वये फौजदारी खटला दाखल केला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशन ला सी.आर.पी.सी कलम २०२ नुसार सखोल चौकशी करून अहवाल दाखल करण्याचे आदेश करण्यात आले होते,त्यानुसार पोलिस स्टेशन ने चौकशी अहवाल दाखल केलेला होता.
दरम्यान..
खटल्यातील आरोपी डॉ. तुकाराम बिराजदार यांनी ८ नोव्हेंबर२०२१ रोजी धरणगाव न्यायालयासमोर उपस्थित राहून फिर्यादी डॉ. प्रविण बोरसे यांनी केवळ आरोपीस शासन व्हावे या हेतुने महत्वाच्या बाबी व घटना न्यायालयापासून लपवुन ठेवल्याचे कथन केले.
फिर्यादी डॉक्टर बोरसे यांचेवर रीतसर कारवाई होण्याबाबत तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला.
धरणगाव न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एस.डी.सावरकर यांनी प्रा.बिराजदार यांची लेखी तक्रार दाखल करून घेतली.
प्राचार्य बिराजदार यांच्यातर्फे अँड-मोहन शुक्ला हे कामकाज पाहत असुन त्यांना अँड-सुजीत पाठक हे सहकार्य करीत आहेत.