हायलाइट्स:
- मुंबईकरांनो, तुमच्या केकमध्ये गांजा किंवा भांग तर नाही ना?
- मुंबईत गांजा आणि भांग मिक्स करून विकले केक-पेस्ट्री
- खाद्यपदार्थांमध्ये गांजा जप्त केल्याची ही भारतातील पहिली घटना
मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) गेल्या एक वर्षापासून मुंबईत अमली पदार्थांच्या (Drugs) संदर्भात छापेमारी करत आहे. याच छाप्यात मुंबईच्या मलाडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाडमधील एका बेकरीमध्ये ड्रग्ज मिसळलेले केक आणि पेस्ट्री विकले जात होते. भारतात अशी ही पहिलीच घटना समोर आली आहे. यामध्ये NCB ने 3 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
एनसीबीने केलेल्या छापेमारीमध्ये भांग टाकून बनवलेला 830 ग्रॅम केक आणि 35 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागिरकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने खाद्यपदार्थांमध्ये गांजा जप्त केल्याची ही भारतातील पहिली घटना आहे.
अधित माहितीनुसार, या प्रकरणामध्ये एका महिलेलादेखील अटक करण्यात आलं आहे. जगत चौरसिया नावाची व्यक्ती बेकरीमध्ये ड्रग्ज पुरवत होती. चौरसिया याला वांद्रे इथून अटक करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून 125 ग्रॅम गांजा करण्यात आला.
आरोपींवर गुन्हा दाखल
या संदर्भात नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट 1985 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. खरंतर, सध्या तरुणांमध्ये भांग आणि केक खाण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे अशा ड्रग्जच्या पदार्थांची मागणीही वाढली आहे. पण यामुळे आताची तरुणाई मोठ्या धोक्यात आहे, हेच म्हणावं लागेल.