संजिवन व्यसन मुक्ती केंद्रातर्फे पंडित नेहरू जयंती साजरी..!

(शैलेश चौधरी)

एरंडोल: येथे बसस्टँड परीसरातील पवार व्यापारी संकुलात असलेल्या संजिवन व्यसन मुक्ती केंद्रातर्फे भारताचे पहिले प्रंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती १४ नोव्हेंबर २०२१ रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील सुविख्यात,ज्येष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी हे होते.
यावेळी पंडित नेहरूच्या प्रतिमेचे पूजन होऊन षुष्पहार अर्पण करण्यात आला.
संस्थाध्यक्ष रोहिदास पाटील यांनी प्रास्ताविक केले. केंद्राचे पदाधिकारी गोकुळ पाटील यांचे व उपस्थितांची समायोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन संजीवनी केद्रांचे प्रकल्प प्रमुख राजेंद्र ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्राचे सचिव संजय बागड यांनी केले. या प्रसंगी शरद पवार,अजय महाजन,भिला पाटील,गोरख चौधरी,खुशाल महाजन आदी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment