एरंडोल येथे क्रांतीगुरू लहुजी साळवे यांची जयंती साजरी..!

एरंडोल: येथे लहुजी युवा मंच तर्फे आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची २२७ वी जयंती उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती वर केंद्रशासनाकडुन नामनिर्देशित सदस्य असलेले सामाजिक कार्यकर्ते सुनील खोकरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमेश परदेशी यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी परेश बिर्ला,माधव जगताप,सागर नेटके,अमित चव्हाण,शाहरुख बागवान,जितेंद्र बोडरे,अमोल भावसार, छोटु पाटील,आशा चव्हाण,सतिश चित्ते,एकनाथ चव्हाण, अभिषेक जगताप,जिजाबाई चव्हाण,कविता चव्हाण आदी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment