Pune फरासखाना पोलीसांनी वाहन चोराच्या मुसक्या आवळुन त्याचेकडुन ४ दुचाकी वाहन चोरीच्या गाडया केले जप्त

१६/११/२०२१ फरासखाना पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळुन त्याचेकडुन ४ दुचाकी वाहन चोरीच्या गाडया जप्त

मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वाहनचोरांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अभिजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना वाहन चोरांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबतच्यासुचना दिलेल्या आहेत.फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील प्रभारी अधिकारी अभिजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तपास पथकातील पोलीस अंमलदारांसह वाहन चोरांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांना पुणे पोलीस आयुक्तालयातील रेकॉर्डवरीलआरोपी गणेश मल्लेश रायचुर, वय २५ वर्षे, रा. ळ रा. ५४ एच पी लोहीयानगर, फायरब्रिगेड समोर, गल्ली नंबर५, कांबळे गल्ली, पुणे हा चोरीची दुचाकी गाडी घेवुन थांबला आहे अशी बातमी मिळाल्याने फरासखाना पोलीसांनीदुधभट्टी गणेश पेठ, पुणे या ठिकाणाहुन गणेश रायचुर हा त्याचे ताब्यात ऍक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमांकMH.12.KW.1836 यासह ताब्यात घेतले. सदर गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गुरंनं १८५/२०२१ भादंविकलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.अटके दरम्यान आरोपी गणेश रायचुर याचेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी आरोपीकडे तपास करता त्याने आणखीन चार गाडया चोरी केल्याची कबुलीदेवुन त्याने सदरच्या गाडया निवेदन पंचनाम्याने काढुन दिल्या आहेत.
९०२८२९३३३७

त्या गाडयांबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखलआहेत.१. ऍक्टीव्हा दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.एन.टी.५४८८ या गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशनगुन्हा रजि नंबर १८८/२०२१ भादवि कलम ३७९२. होंडा कंपनीची शाईन दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.के.डब्ल्यु ९०२३ या गाडीबाबत फरासखानापोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १७३/२०२१ भादवि कलम ३७९,३. यमाहा कंपनीची दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.बी.झेड २७६१ या दुचाकी गाडीबाबत फरासखानापोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८३/२०२१ भादवि कलम ३७९,वरील प्रमाणे ४ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन सदरचे दुचाकी वाहनेआरोपीकडुन गाडया जप्त करण्यात आली आहेत.तसेच सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत वाहन चोर असुन त्याचेकडुन आणखीन गुन्हे उघडकीसहोण्याची दाट शक्यता असुन त्याचेकडे पुढील तपास अजितकुमार पाटील, तेजस्वी पाटील, पोलीस उप निरीक्षकहे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.अभिताभ गुप्ता साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, डॉ. रविंद्र शिसवे सो, सह पोलीस आयुकत, पुणे शहर, श्री.राजेंद्र डहाळे, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, डॉ. प्रियंका नारनवरे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे, मा.श्री. सतिश गोवेकर साो, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशन कडील श्री.राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संदीप कांबळे, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, राकेश क्षिरसागर, ऋषीकेश दिघे,अभिजीत शिंदे यांच्या पथकाने केली आहे.(राजेंद्र लांडगे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन,पुणे शहर

Comments (0)
Add Comment