स्वातंत्र्यानंतर प्रथमच मेळघाटातील गाव प्रकाशानं उजळलं; महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प

अमरावती: देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग दुर्लक्षित आहे. रस्ते नसल्यामुळे अनेक ठिकाणी अजून बस पोहोचली नाही तर आजही दऱ्याखोऱ्यातील अनेक गाव विजेपासून वंचित आहेत. याच गावांना सौरऊर्जेचा आधार देत प्रकाशमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून चोपण हे गाव लवकरच प्रकाशमान होणार असून याची पाहणी नुकतीच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली आहे.

जिल्ह्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील चौराकुंड ग्रामपंचायतीअंतर्गत चोपण हे दुर्गम गाव आहे. तेथील १६१ घरांना या प्रकल्पामुळे वीज जोडणी मिळणार आहे. मेळघाटातील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी वन, ऊर्जा व विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न होतच आहेत. वीज नसलेल्या गावांसाठी हा सोलर मायक्रो ग्रीड प्रकल्प राबवला जात आहे. त्याद्वारे गावाला २४ तास वीजपुरवठा शक्य होतो. चोपण येथील प्रकल्प २४ किलोवॅट क्षमतेचा आहे. त्याची प्रकल्प किंमत ४२. ४४ लाख आहे.अद्यापही वीज न पोहोचलेल्या मेळघाटातील गावांमध्ये वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जाधारित वीज प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाकडून चालना देण्यात येत आहे.

वाचाः ‘राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग’; शिवसेनेची पंतप्रधानांकडे ‘ही’ मागणी

धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला असून, लवकरच तो कार्यान्वित होईल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच या प्रकल्पाची तपासणी केली. याप्रकारे संपूर्ण गावाला वीज उपलब्ध करुन देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे. त्याबाबत प्रशासनातर्फे ‘मेडा’ च्या माध्यमातून ठिकठिकाणी सौर ऊर्जाधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेळघाटातील चोपण या दुर्गम गावात हा प्रकल्प आकारास आला आहे.

वाचाः काँग्रेस हाच भाजपला पर्याय; नाना पटोले यांचे पुन्हा मोठे विधान

Source link

Melghat villagesmsedclsolar power in villagesमेळघाटात वीजसौरउर्जा
Comments (0)
Add Comment