मराठा आरक्षणाप्रश्नी उद्यापासून मूक आंदोलन; कशी असणार आंदोलनाची दिशा?

हायलाइट्स:

  • मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे आक्रमक
  • उद्यापासून मूक आंदोलनाला सुरुवात
  • संभाजी राजेंनी घेतला आढावा

कोल्हापूरः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या संभाजीराजेंनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून कोल्हापूरात मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी आज शाहू समाधीस्थळावरुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला तसंच उद्या होणाऱ्या आंदोलनाचा आढावा घेतला. (maratha reservation)

‘कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. करोना नियमांचं पालन करुन सोशल डिस्टनसिंगचं व नियमांचे पालन करुन शांतपणे आंदोलन करु, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. तसंच, आंदोलनादरम्यान कोणीही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा,’ असंही ते म्हणाले आहेत.

वाचाः आधीच अर्ज का नाही केला?; कोर्टानं कंगनाला फटकारले

‘१६ जूनला दहा ते एक या वेळेत उपोषण होणार असून कोल्हापूरात आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ५ जिल्ह्यात मूक आंदोलन होईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार व तेथील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येईल. आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत,’ असं संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.

वाचाः न्यायालयाचा उल्लेख ‘न्याय मंदीर’; वकिलानं घेतला आक्षेप

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये काल पुण्यात बैठक झाली. ‘दोन्ही छत्रपती घराण्यांना मोठा सामाजिक वारसा असून, आम्ही समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही,’ असे नमूद करत संभाजीराजे यांनी १६ जूनपासून पुकारलेल्या मूक आंदोलनाच्या मागण्या मांडल्या. ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत आमच्यासह समाजाने भूमिका मांडली आहे, आता लोकप्रतिनिधींनी बोलावे, असं संभाजी राजे म्हणाले होते.

वाचाः शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेले एक कोटी परत घ्यावेत; भाजप भडकला

Source link

Maratha ReservationSambhaji Rajeमराठा आरक्षणमराठा मोर्चासंभाजीराजे
Comments (0)
Add Comment