धक्कादायक! आरोपीने पोलिस ठाण्याच्या समोरच केली आत्महत्या

नागपूर: पोलिस स्टेशनसमोर उभ्या ट्रकच्या केबिनला तार बांधून विश्वासघात प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अशोक जितूलाल नागोत्रा (वय ४८ रा. शेंडेनगर),असे मृतकाचे नाव आहे. (accused commits suicide in front of police station in nagpur)

अशोक हा चालक आहे. तो वाहतूकदार राजेंद्र चौहान यांच्याकडे गत २० वर्षांपासून चालक म्हणून काम करायचा. १२ जूनला अशोक हा तेलाचे बॉक्स घेऊन ट्रकने (एमएच-०४-जीआर-२७७४) मुंबईला निघाला. बाजारगाव परिसरात त्याने ट्रक उभा केला. यादरम्यान ट्रकमधून तीन लाख ६८ हजार रुपये किमतीचे तेलाचे बॉक्स चोरी गेले. राजेंद्र चौहान यांनी कोंढाळी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अशोक याच्याविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला.

क्लिक करा आणि वाचा- लोकप्रतिनिधींना गाडण्याचे उदयनराजेंचे वक्तव्य, अजित पवार म्हणाले…

दरम्यान ट्रक पोलिस स्टेशनसमोर पार्क करण्यात आला. मालकाने संशय घेतल्याने अशोक हताश झाला. सोमवारी मध्यरात्री अशोक याने ट्रकच्या केबिनला तार बांधून गळफास घेतला. मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तो लटकलेला दिसला. पोलिसांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी कोंढाळीत पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याप्रकरणाचा तपास सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरंबळकर करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण: उद्या मूक आंदोलन; प्रकाश आंबेडकरही होणार सहभागी
क्लिक करा आणि वाचा- अमरावतीकरांना दिलासा; टाळेबंदी शिथिल, ‘हे’ आहेत नवीन नियम

Source link

suicidesuicide in front of police stationsuicide of accusedनागपूरनागपूर आत्महत्यापोलिस ठाण्यासमोर आत्महत्या
Comments (0)
Add Comment